Europe  Dainik Gomantak
ग्लोबल

'मलिक' नावाच्या हिमवादळाने युरोपात कहर

उत्तर युरोपात आलेल्या भीषण बर्फाच्या वादळामुळे किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर युरोपात आलेल्या भीषण बर्फाच्या वादळामुळे किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे अनेक घरे आणि गाड्यांचे नुकसान झाले, काही पूल बंद झाले आणि हजारो घरांचा वीजपुरवठाही खंडित झाला. या हिमवादळाला 'मलिक' असे नाव देण्यात आले असून रविवारी ते नॉर्डिक प्रदेशाकडे सरकले. यामुळे डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे (Norway) आणि स्वीडनमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. (Europe Latest News)

मलिक चक्रीवादळ ब्रिटनमधून (Britain) आल्यावर शनिवारी रात्री उशिरा नॉर्डिक प्रदेश आणि उत्तर जर्मनीमध्ये पोहोचले, जिथे त्याने मालमत्तेचे आणि वाहतुकीच्या साधनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या बर्फाच्या वादळामुळे स्कॉटलंडला मोठा फटका बसला आहे. ब्रिटनच्या उत्तरेकडील भागात असलेल्या स्टॅफोर्डशायरमध्ये वादळामुळे एक झाड पडल्याने एका नऊ वर्षांच्या मुलाला आणि एका 60 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. स्कॉटलंडमध्ये जोरदार वाऱ्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि हजारो घरांचा वीजपुरवठा खंडित झाला.

डेन्मार्कमध्ये मुसळधार पावसामुळे पूल बंद झाला

वादळामुळे डेन्मार्कमध्ये जोरदार पाऊस झाला आणि शनिवारी अनेक पूल तात्पुरते बंद करावे लागले. येथे जोरदार वाऱ्यामुळे 78 वर्षीय महिला पडून जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. जर्मनीत वादळामुळे होर्डिंग कोसळून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. युरोपला अशा वादळाचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ नसून याआधीही अशीच परिस्थिती इथे पाहायला मिळाली आहे.

अमेरिकेतही बर्फाचे वादळ आले

युरोपशिवाय अमेरिकेतही अनेक ठिकाणी बर्फाचे वादळ आहे. त्यामुळे 7 कोटींहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. या लोकांना विजेविना जगावे लागत आहे. येथील वाहतूक ठप्प झाली आहे. हजारो उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. अनेक राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. लोकांना शक्य असल्यास रस्त्यांपासून दूर राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. न्यूयॉर्क आणि बोस्टनसारखी शहरेही हिमवादळाच्या तडाख्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT