South Korea President Moon Jae-in

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

'I Am Sorry', कोरोनाचा वाढता धोका पाहता या देशाच्या राष्ट्रपतींनी मागितली माफी

रेस्टॉरंट्स आणि कॅफेच्या कामकाजाच्या वेळेवर रात्री 9 वाजता कर्फ्यू (Curfew) पुनर्संचयित करण्यासाठी नवीन उपाययोजना जाहीर केल्यानंतर मून यांनी माफी मागितली.

दैनिक गोमन्तक

दक्षिण कोरियाचे (South Korea) राष्ट्राध्यक्ष मून जे-इन (Moon jae-in) यांनी गुरुवारी कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूच्या वाढीनंतर कठोर सोशल डिस्टन्सिंगचे (Social distance) उपाय पुनर्संचयित केल्याबद्दल देशाची माफी मागितली. योनहाप वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने जास्तीत जास्त खाजगी कार्यक्रमासाठी चार लोकांची मर्यदा घालून दिली आहे. रेस्टॉरंट्स आणि कॅफेच्या कामकाजाच्या वेळेवर रात्री 9 वाजता कर्फ्यू (Curfew) पुनर्संचयित करण्यासाठी नवीन उपाययोजना जाहीर केल्यानंतर मून यांनी माफी मागितली.

दरम्यान, मून यांचे प्रवक्ते पार्क क्युंग-मी यांनी सांगितले की, "मला खेद वाटतो की, आम्हाला पुन्हा एकदा अँटीव्हायरस उपायांची अमंलबजावणी करावी लागणार आहे." "टप्प्याटप्प्याने सामान्य स्थितीत परत येत असताना, आम्ही गंभीर आजारी रुग्णांची वाढ रोखण्यात अयशस्वी झालो. रुग्णालयातील बेड सुरक्षित करण्यासह पुरेशी तयारी करण्यात मात्र अयशस्वी झालो," असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

राष्ट्रपतींच्या म्हणण्यानुसार, 2 जानेवारी 2022 पर्यंत निर्बंध लागू राहतील, या कालावधीत परिस्थिती शक्य तितक्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. विशेषत: लहान व्यवसायाचे मालक आणि स्वयंरोजगारावर असलेल्या लोकांना या निर्बंधांचा फटका बसण्याची शक्यता असल्याने आर्थिक नुकसान भरपाई देण्याचा जलद निर्णय घेण्यात येणार असल्याचे देखील आश्वासनही त्यांनी दिले आहे.

नवीन उपायांनुसार, रेस्टॉरंट्स आणि कॅफेमध्ये लसीकरण केलेल्या लोकांनाच मर्यादीत प्रवेश मिळणार आहे. बार, नाईट क्लब आणि इतर मनोरंजन स्थळे देखील रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहतील. चित्रपटगृहे, कॉन्सर्ट हॉल आणि इंटरनेट कॅफे रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहतील.

शिवाय, दक्षिण कोरियामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यानंतर हा अचानक बदल झाला आहे, तसेच कोरोनाचे गंभीर रुग्ण आणि मृत्यूची संख्या देखील वाढली आहे. दररोज 8,000 च्या आसपास रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. तर मंगळवारी 94 लोकांचा मृत्यू झाला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT