डेन्मार्कच्या नागरिकांना मिळणार कोविड-19 लसीचा तिसरा डोस

डेन्मार्कमध्ये (Denmark) रविवारपर्यंत ओमिक्रॉनचे 2,471 रुग्ण सापडले आहेत.
COVID-19 

COVID-19 

Dainik Gomantak 

Published on
Updated on

डेन्मार्कमध्ये ओमिक्रॉन (Omicron variant) प्रकाराचा प्रसार रोखण्यासाठी 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोविड-19 (COVID-19) लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. "नवीन आणि अधिक संसर्गजन्य ओमिक्रॉन प्रकाराच्या प्रसारामुळे डेन्मार्क आरोग्य प्राधिकरणाने 40 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रत्येक नागरिकाला लसीचा (Vaccine) तिसरा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या डोस मध्ये साडेचार महिन्यांचा कालावधी असेल," असे आरोग्य प्राधिकरणाने एका निवेदनात म्हटले आहे.

<div class="paragraphs"><p>COVID-19&nbsp;</p></div>
दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना झाली कोरोनाची लागण

इंग्लंड (England) सरकारने देखील बुस्टर डोस देण्याची गती वाढवली आहे. इंग्लंडच्या पाठोपाठ डेन्मार्कमध्येओमिक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. या मुळे दोन्ही देशांनी टेस्टिंगचे प्रमाण वाढवले आहे.

डेन्मार्कमध्ये (Denmark) रविवारपर्यंत ओमिक्रॉनचे 2,471 रुग्ण सापडले आहेत. या देशाची लोकसंख्या 5.8 दशलक्ष असून, 80.6 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. ओमिक्रॉन प्रकार डेल्टा व्हेरियंटपेक्षा वेगाने पसरत असल्याचे चित्र दिसत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

डेन्मार्क सरकारने गेल्या आठवड्यात नागरिकांवर नवीन निर्बंध लावले. येथील शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Times Square shooting during NBA celebration
Thierry Henry Criticism of Cristiano Ronaldo
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com