Houthi Rebels Threat Pakistan Turkey Makkah Pact Dainik Gomantak
ग्लोबल

Houthi Saudi Conflict: सौदी अरेबियानंतर कुणाचा नंबर? हूतींच्या धमकीमुळे पाकिस्तान-तुर्कीच्या गोटात घबराट; म्हणाले, ''परकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही!" VIDEO

Houthi Rebels Threat Pakistan Turkey Makkah Pact: तांबड्या समुद्रातील सौदी अरेबियाच्या तेल प्रकल्पांवर आणि पाइपलाईनवर हल्ले केल्यानंतर हूती बंडखोरांनी आता थेट सौदी अरेबियावर क्षेपणास्त्रे डागली.

Manish Jadhav

Houthi Rebels Threat Pakistan Turkey Makkah Pact: मध्य पूर्वेतील तणाव आता अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला. तांबड्या समुद्रातील सौदी अरेबियाच्या तेल प्रकल्पांवर आणि पाइपलाईनवर हल्ले केल्यानंतर हूती बंडखोरांनी आता थेट सौदी अरेबियावर क्षेपणास्त्रे डागली. हूतींची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे थेट सौदीची राजधानी रियाद आणि औद्योगिक केंद्र असलेल्या यानबू शहरापर्यंत पोहोचल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली.

रियादच्या दिशेने येणारे क्षेपणास्त्र सौदी सैन्याने हवेतच नष्ट केले असले तरी या हल्ल्याच्या तीव्रतेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपला वीकेंड दौरा रद्द करुन तातडीने व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत. अमेरिकन सैन्याचे बॉम्बर विमानही ब्रिटनच्या एअरबेसवरुन आखाताच्या दिशेने रवाना झाले असून परिस्थिती गंभीर बनली आहे.

या वाढत्या संघर्षादरम्यान ऐतिहासिक 'मक्का पॅक्ट' अंतर्गत तुर्की आणि पाकिस्तानने (Pakistan) सौदी अरेबियाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. मक्का कराराच्या नियमांनुसार या तिन्ही देशांपैकी एकावर झालेला हल्ला हा तिघांवर झालेला हल्ला मानला जातो. या करारानुसार तुर्की आणि पाकिस्तानचे सैन्य सौदीत तैनात होत असल्याचे पाहून हूती बंडखोरांनी या दोन्ही देशांना उघड धमकी दिली.

हूती नेता अल बुखैती याने स्पष्ट इशारा दिला की, जर तुर्की आणि पाकिस्तानने सौदी अरेबियाला लष्करी मदत केली तर त्यांच्यावरही थेट प्रहार केले जातील. सौदी अरेबियासोबतच्या वादात कोणत्याही परकीय ताकदीचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही आणि सौदीनंतर आता पाकिस्तान व तुर्कीचाच नंबर असेल, अशी धमकी हूतींनी दिली.

दुसरीकडे तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकन फिदान यांनी सौदी अरेबियाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी लष्करी मदत देण्याचे जाहीर केले. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षात सौदी अरेबियाला जबरदस्तीने ओढणे चुकीचे असल्याचे तुर्कीने म्हटले. सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी येमेनमधील निष्पाप नागरिकांचा विचार करुन संयम बाळगल्याचे स्पष्ट केले, अन्यथा या हल्ल्याचे भीषण परिणाम हूतींना भोगावे लागले असते. रियाद विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर आगीचे लोट आणि काळा धूर पसरल्याचे व्हिडिओ समोर आले असून, या हल्ल्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT