Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

Houthi Missile Attack Saudi Arabia Khamis Mushait: इराण-अमेरिका आणि इस्रायल-लेबनॉन यांच्यातील तणावानंतर आता मध्य पूर्वेतील युद्ध अधिक भयानक वळणावर पोहोचले आहे.
Houthi Missile Attack Saudi Arabia Khamis Mushait
Houthi Missile Attack Saudi ArabiaDainik Gomantak
Published on
Updated on

Houthi Missile Attack Saudi Arabia Khamis Mushait: इराण-अमेरिका आणि इस्रायल-लेबनॉन यांच्यातील तणावानंतर आता मध्य पूर्वेतील युद्ध अधिक भयानक वळणावर पोहोचले आहे. येमेनमधील इराणसमर्थित हूती विद्रोही आणि सौदी अरेबिया आता थेट आमने-सामने आले आहेत. हूती विद्रोह्यांनी सौदी अरेबियाच्या शहरांवर आणि लाल समुद्रातील महत्त्वाच्या ठिकाणांवर सातत्याने हल्ले सुरुच ठेवले आहेत. काल रात्री हूती विद्रोह्यांनी नैऋत्य सौदी अरेबियातील खमीस मुशैत शहराला लक्ष्य करत प्राणघातक ड्रोन आणि शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी भीषण हल्ला चढवला.

या क्षेपणास्त्र हल्ल्यात खमीस मुशैत येथील अत्यंत महत्त्वाचा लष्करी एअरबेस थेट हादरला असून, 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच 7 निवासी घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून अनेक नागरिकांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले.

Houthi Missile Attack Saudi Arabia Khamis Mushait
Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

सौदी अरेबियाच्या लष्करी सूत्रांनुसार, खमीस मुशैतवरील हा हल्ला येमेनमध्ये सौदी अरेबियाने (Saudi Arabia) केलेल्या हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून हूतींनी केला. सध्या तात्पुरता धोका टळला असला तरी परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सौदी प्रशासनाने खमीस मुशैतसह आभा, ताइफ, जेद्दाह आणि जाजान या प्रमुख शहरांमध्ये इमर्जन्सी अलर्ट जारी केला. संपूर्ण देशात लष्करी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Houthi Missile Attack Saudi Arabia Khamis Mushait
Iran America Conflict: 5 तेल टँकर्स खाक झाल्यानंतर इराणचा मोठा गेम! अमेरिकेच्या 21 कोटींच्या 'ड्रोन पाणबुडी'वर केला कब्जा; व्हिडिओ शेअर VIDEO

यापूर्वी, 14 सप्टेंबर रोजी हूती विद्रोह्यांनी दक्षिण सौदी अरेबियातील आभा, खमीस मुशैत आणि ताइफसारख्या नागरी वस्त्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली होती. या भीषण प्रक्षोभाला चोख प्रत्युत्तर देत सौदी अरेबियाने येमेनमध्ये हूतींच्या लष्करी ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले केले होते. सौदीच्या लढाऊ विमानांनी हूतींचे विमान हँगर, प्रगत रडार सिस्टीम, धावपट्ट्या आणि दारुगोळ्याची गोदामे बॉम्बफेक करुन उद्ध्वस्त केली होती.

Houthi Missile Attack Saudi Arabia Khamis Mushait
Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

या प्रत्याक्रमणानंतर संतापलेल्या हूतींनी सौदीच्या लष्करी तळांवर थेट हल्ला चढवून युद्धाची तीव्रता कैक पटीने वाढवली. लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवरील हल्ले आणि आता सौदीच्या भूमीवरील थेट क्षेपणास्त्र वर्षावामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत महायुद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या वाढत्या तणावामुळे इंधनाच्या पुरवठ्यावर आणि सुरक्षेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com