Houthi Attack: हुथी बंडखोरांचा लाल समुद्रात हैदोस! आठवड्यात दुसऱ्यांदा हल्ला, टायटॅनिकसारखे बुडाले मालवाहू जहाज; Video

Houthi Rebels Red Sea Attack: येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात मॅजिक सीज नावाच्या जहाजावर हल्ला करुन ते बुडवले.
Houthi Rebels Red Sea Attack
Houthi AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Houthi Rebels Red Sea Attack: येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात मॅजिक सीज नावाच्या जहाजावर हल्ला करुन ते बुडवले. हे जहाज लायबेरियाचा ध्वज असलेले आणि ग्रीक मालकीचे बल्क कॅरियर होते. येमेनच्या (Yemen) हुथी बंडखोरांनी 6 जुलै 2025 रोजी हा हल्ला केला. हुथींनी या जहाजावर हल्ला करण्यासाठी ड्रोन, क्षेपणास्त्रे, रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड आणि लहान शस्त्रांचा वापर केला. हुथी बंडखोरांनी या जहाजावरील हल्ल्याचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये समुद्री जहाजात एक भयानक स्फोट होताना दिसतो.

दरम्यान, स्फोटानंतर काही सेकंदातच जहाजाला आग लागली. काही वेळातच जहाजात मोठा स्फोट झाला आणि मॅजिक सीज नावाच्या जहाजाचे दोन तुकडे झाले. त्यानंतर ते लाल समुद्रात बुडाले. स्फोटानंतर जहाज फुटल्याचे दृश्य टायटॅनिक चित्रपटातील दृश्यासारखेच होते, जिथे प्रसिद्ध लक्झरी जहाज हिमखंडाला आदळते आणि त्याचे दोन भाग होतात. हुथींनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून त्यांनी दावा केला की, या जहाजाने इस्रायलविरुद्ध केलेल्या नाकेबंदीचे उल्लंघन केले. हुथींच्या हल्ल्यामुळे जहाजातील 22 क्रू मेंबर्सना जहाज सोडून पळून जावे लागले. तथापि, नंतर त्यांना जिवंत वाचवण्यात आले.

Houthi Rebels Red Sea Attack
Houthi Missile Attack: हुथी बंडखोरांनी इस्रायल विमानतळाला बनवले लक्ष्य, पुन्हा डागली क्षेपणास्त्रे; व्हिडिओ व्हायरल!

युरोपियन युनियन नौदल मोहिमेच्या ऑपरेशन अ‍ॅस्पाइड्सने मंगळवारी पुष्टी केली की, लाल समुद्रात हुथींनी लायबेरियाच्या ध्वज असलेल्या ग्रीक मालकीच्या मालवाहू जहाजावर हल्ला केला, ज्यामध्ये तीन खलाशी ठार झाले आणि इतर दोघे जखमी झाले.

दरम्यान, जखमी झालेल्या एका क्रू मेंबरला एक पाय गमवावा लागला. सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणात वाहतूक करणारे जहाज सुएझ कालव्याच्या दिशेने उत्तरेकडे जात असताना लहान बोटी आणि बॉम्बने भरलेल्या ड्रोनमधून गोळीबार सुरु झाला. जहाजावरील सशस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर दिले, परंतु त्यांचा तो हल्ला रोखण्यात अपयशी ठरले.

Houthi Rebels Red Sea Attack
US vs Houthi: "तर आम्हीही चोख प्रत्युत्तर देऊ," हुथी बंडखोरांनी अमेरिकन जहाजावर डागली तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे

दुसरीकडे, हुथी बंडखोर बऱ्याच काळापासून लाल समुद्रात व्यापारी जहाजांना लक्ष्य करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, इस्रायल-हमास (Hamas) संघर्षाच्या समर्थनार्थ हमासकडून हे हल्ले केले जात आहेत. लाल समुद्र हा जागतिक व्यापारासाठी एक महत्त्वाचा मार्ग असल्याने या घटनेमुळे या प्रदेशातील सागरी सुरक्षेबाबाबत चिंता निर्माण झाली आहे. या हल्ल्याचा जागतिक पुरवठा साखळीवरही परिणाम होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय समुदायाने या घटनेचा निषेध केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी या प्रदेशातील तणाव कमी करण्याचे आवाहन देखील केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com