Pakistan Currency Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Currency: पाकिस्तान आणखी गाळात; डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण

गाठली 75 वर्षांतील नीचांकी पातळी

Akshay Nirmale

Pakistan Currency: पाकिस्तानमधील आर्थिक संकट शिगेला पोहोचले आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसाठी प्रत्येक दिवस नवीन समस्या घेऊन येत आहे. संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आता त्याच्या चलनाचीही साथ मिळेनाशी झाली आहे.

पाकिस्तानी रुपयाची डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरण होत आहे. आता पाकिस्तानी रुपयानेही डॉलरच्या तुलनेत गेल्या 75 वर्षांतील नीचांकी पातळी गाठली आहे.

पाकिस्तान कोणत्या परिस्थितीतून जात आहे याची सर्वांना जाणीव आहे. आता पाकिस्तानच्या घसरलेल्या रूपयाने त्यात आणखी भर टाकली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली असून आता पाकिस्तानी रूपयाचा डॉलरशी विनिमय दर 262 वर पोहोचला आहे. म्हणजे एक अमेरिकन डॉलरसाठी 262 पाकिस्तानी रूपये द्यावे लागतात.

एका वेळी खुल्या बाजारात चलन रु. 265 आणि आंतरबँक परकीय चलन बाजारात रु. 266 पर्यंत घसरले होते. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी बाजार उघडला तेव्हा चलन गुरुवारच्या बंद किंमतीपासून 7.17 रुपये किंवा 2.73 टक्क्यांनी घसरले. शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी चलनात कमालीची घसरण झाली. अमेरिकन चलनाच्या तुलनेत तो 262.6 रुपयांवर पोहोचला.

गुरुवारी, पाकिस्तानी रुपया सुमारे 9.67 टक्क्यांनी घसरला आणि त्यानंतर रुपया 1 डॉलरच्या तुलनेत 255.43 पाकिस्तानी रुपयांवर पोहोचला. पाकिस्तान सरकारची डोकेदुखी वाढली आहे कारण पाकिस्तानी रुपयाची ही विक्रमी घसरण थांबण्याची आशा नाही आणि आता हा आकडा 262.6 रुपयांवर पोहोचला आहे.

बुधवारी पाकिस्तानी रुपया प्रति डॉलर 230 रुपयांवर बंद झाला होता. गुरुवारी बाजार सुरू झाल्यानंतर काही तासांतच तो आणखी घसरून 255 रुपयांवर आला.

मदत पॅकेज जारी करण्यासाठी पाकिस्तान नाणेनिधीशी चर्चा करत आहे. काही दिवसांपूर्वी, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते की त्यांचे सरकार गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले 6 अब्ज डॉलर्सचे मदत पॅकेज मिळविण्यासाठी जागतिक नाणे निधीच्या (आयएमएफ) कठोर अटी स्वीकारण्यास तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'रामा'च्या न्यायासाठी पणजीत काढलेला मोर्चा अवैध असल्याचा आरोप; युरी आलेमाव, विजय सरदेसाई यांच्यासह 450 जणांविरोधात गुन्हा

Sanguem: ..अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली! सांगेतील माय-लेकीला मिळाला हक्काचा निवारा; मंत्री फळदेसाईंचा पुढाकार

Goa Coconut Price: नारळ अजून महागच! टोमॅटो, कांदाही भडकला; वाचा ताजे दर

Goa News Live: ओपा प्रकल्पातील पंप अखेर सुरु, राजधानीला मिळणार पाणी

Zilla Panchayat Election: गोवा फॉरवर्ड, ‘आप’कडून जोर, काँग्रेस स्‍वस्‍थच! जिल्‍हा पंचायत निवडणूक; सरदेसाईंकडून उमेदवार चाचपणी

SCROLL FOR NEXT