Prime Minister Sheikh Hasina Dainik Gomantak
ग्लोबल

हिंदूंनी स्वतःला अल्पसंख्याक समजू नये: पंतप्रधान शेख हसीना

याच पाश्वभूमीवर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या (Prime Minister Sheikh Hasina) सरकारने तातडीने पावले उचलत 22 जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दलांची तैनात केली.

दैनिक गोमन्तक

बांग्लादेशात (Bangladesh) दुर्गा पूजा उत्सवाच्या (Durga festival) वेळी काही मुस्लिम कट्टरपंथियांनी हिंदू (Hindu) बांधवांची मंदिरे आणि दुर्गापूजा पंडालची तोडफोड केली. यानंतर तेथे हिंसाचार भडकला ज्यात चार लोकांचा मृत्यू झाला आणि काहीजण जखमीही झाले. याच पाश्वभूमीवर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या (Prime Minister Sheikh Hasina) सरकारने तातडीने पावले उचलत 22 जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दलांची तैनात केली.

दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी गुरुवारी ढाका (Dhaka) येथील ढाकेश्वरी मंदिरात सार्वजनिन पूजा समितीने आयोजित केलेल्या महानवमी दुर्गा पूजेत सहभागी होत म्हटले की, ''तुम्ही या देशाचे नागरिक आहात. तुम्हालाही समान हक्कांसह जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच इतर नागरिकांना असणारे सर्व समान अधिकार देशाच्या राज्यघटनेने तुम्हाला प्रधान केले आहेत. तुम्ही तुमच्या धर्माचे पालन करत समान अधिकारांतर्गत तुमचे उत्सवही साजरे करु शकता. देशात अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक समाजाने गुण्यागोविंदाने रहावे हीच आमची इच्छा आहे. आणि हेच आपल्या बांगलादेशचे खरे धोरण आणि आदर्श तत्व आहे. मी तुम्हाला पुन्हा विनंती करते की, तुम्ही स्वतःला कधीही अल्पसंख्याक समजू नका. मी तुम्हाला वचन देते की, ज्यांनी हिंसा केली तसेच मंदिरांमध्ये जाऊन तोडफोड केली त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.'' बांगलादेशमध्ये 17 करोड़ लोकसंख्येपैकी 10 टक्के लोक हिंदू आहेत.

त्या पुढे म्हणाल्या, तुम्हीही या देशाचे नागरिक आहात. तसेच तुम्हाला समान हक्क प्रधान करण्यात आले आहेत. तुम्हाला समान अधिकार प्रधान करण्यात आले आहेत. तुम्ही तुमच्या धर्माचे पालन करत आणि समान हक्काने सण समारंभही साजरे करु शकता. आणि आम्हालाही तेच हवे असून हे आपल्या बांगलादेशचे खरे धोरण आहे.

ढाका येथील ढाकेश्वरी मंदिरात महानगर सर्वजन पूजा समितीने आयोजित केलेल्या दुर्गा पूजेच्या महानवमीमध्ये भाग घेताना त्या म्हणाल्या, "मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पुन्हा कधीही स्वतःला अल्पसंख्याक समजू नका." येथे अल्पसंख्यांक-बहुसंख्याच्या आधारावर न्याय करण्यात येत नाही. तुम्ही स्वतंत्र बांग्लादेशमधील मुक्त नागरिक आहात. तुमच्याकडे तो आत्मविश्वास असावा, मला तेच हवे आहे .. तुम्ही स्वतःला एक छोटासा समाज का मानता? असा सवालही यावेळी पंतप्रधान हसीना यांनी उपस्थित केला.

शिवाय, तुम्हाला सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, तुम्ही या भूमीत जन्म घेतला असून तुम्हाला तुमच्या उत्सवाचा आनंद घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. इथे प्रत्येकजण स्वतःच्या अधिकारात राहतो .. मी तुम्हाला अल्पसंख्याक मानत नाही, आम्ही तुम्हाला आमचे नातेवाईक मानतो. अर्थातच जातीय सलोखा नष्ट करणाऱ्यांना आपण शोधून काढत त्यांच्यावर कठोर कारवाई करु असेही त्यांनी यावेळी म्हटले. मला सर्वांना आठवण करुन द्यायची आहे की, बांग्लादेश सांप्रदायिक सद्भाव आणि सलोख्याची भूमी आहे. येथे सर्व धर्माचे लोक एकत्र राहतात आणि आपआपल्या धर्माचे पालन करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

Goa tourism: कझाकस्तानमधून पहिलं चार्टर विमान गोव्यात दाखल, दाबोळी विमानतळावर विदेशी पर्यटकांचं केक कापून स्वागत

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

Election Commission: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! बिहारनंतर आता देशातील 12 राज्यांमध्ये होणार 'एसआयआर'

Goa Politics: "एकटा लढेन, मागे फिरणार नाही",पक्ष तिकीट न मिळाल्यास 'स्वतंत्र' लढणार; डॉ. केतन भाटीकर यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT