'आम्ही शांतताप्रिय मात्र...' पाकिस्तानचा भारताला सज्जड दम

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बऱ्याच काळापासून ताणलेले आहेत. यामागील कारण म्हणजे पाकिस्तानने दहशतवाद वाढवणे
Pakistan warns India on Amit Shahs surgical strike statement
Pakistan warns India on Amit Shahs surgical strike statement Dainik Gomantak

भारत (India) आणि पाकिस्तानमधील (Pakistan) संबंध बऱ्याच काळापासून ताणलेले आहेत. यामागील कारण म्हणजे पाकिस्तानने दहशतवाद वाढवणे आणि दहशतवाद्यांना भारतात घुसवणे. मात्र आता पुन्हा एकदा पाकिस्तानने स्वतःला निर्दोष असल्याचे विधान केले आहे. पाकिस्तान एक शांतताप्रिय देश आहे मात्र आम्ही भारताची कोणतीही 'आक्रमक योजना' उधळण्यात कोणतीही कसर सोडणार नाही असे सांगितले आहे. पाकिस्तानने हे विधान करण्याचे कारण म्हणजे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी काल गोव्यातील (Goa) भाषणात सर्जिकल स्ट्राईकचा (surgical strike) उल्लेख केला होता.(Pakistan warns India on Amit Shahs surgical strike statement)

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची आठवण करून देत अमित शहा यांनी गुरुवारी सांगितले की सर्जिकल स्ट्राईक हा भारताच्या संरक्षणाचा नवा अध्याय आहे. अमित शहा म्हणाले, 'सर्जिकल स्ट्राईक हे पंतप्रधान मोदी आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाचे पाऊल होते.भारताच्या सीमेवर कोणीही कारवाई करू शकत नाही, असा संदेश आम्ही दिला. चर्चेसाठी याआधी वेळ होता, पण आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. यूपीए सरकारच्या संरक्षण धोरणावर टीका करताना अमित शहा म्हणाले की, यापूर्वी जेव्हा भारताच्या सीमेवर हल्ला झाला होता, तेव्हा चर्चा झाली होती. पण आता बदला घेण्याची वेळ आली आहे.

अमित शहा यांचे वक्तव्य आणखीन एका सर्जिकल स्ट्राईकसाठी इशारा असून हे वक्तव्य बेजबाबदार आणि चिथावणीखोर असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "त्यांचे दिशाभूल करणारे विधान केवळ भाजप-आरएसएस युतीची वैचारिक कारणे आणि राजकीय लाभ दोन्हीसाठी प्रादेशिक तणाव भडकवण्याची प्रवृत्ती प्रतिबिंबित करते. तर पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे. कोणतीही आक्रमक योजना पूर्णपणे उधळून लावण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही."असा दमच दिला आहे.

Pakistan warns India on Amit Shahs surgical strike statement
रशियाला सतावतीय अफगाणिस्तानची चिंता, पुतीन यांचा सीरिया आणि इराकवर आरोप

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, 'पाकिस्तानने 2019 मध्ये भारताच्या बालाकोट धाडसास त्वरित प्रतिसाद दिला. यामध्ये एक भारतीय लढाऊ विमान मारणे आणि भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाला पकडणे समाविष्ट आहे. हे भारतीय आक्रमणाला रोखण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांची इच्छा, क्षमता आणि तयारी पूर्णपणे दर्शवते.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com