Hindu Temple ANI
ग्लोबल

Hindu Temple: कॅनडानंतर अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ला, भिंतींवर खलिस्तान समर्थक आणि भारतविरोधी घोषणा

America: स्वामीनारायण मंदिर वासना संस्थेच्या भिंतींवर भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात द्वेषपूर्ण घोषणा लिहिलेल्या दिसतात.

Manish Jadhav

Hindu Temple: कॅनडानंतर आता अमेरिकेत हिंदू मंदिराशी छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. नेवार्क, कॅलिफोर्निया येथील हिंदू मंदिराच्या बाहेरील भिंतींवर भारतविरोधी आणि खलिस्तान समर्थक घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने ट्विटरवर काही फोटो शेअर केली आहेत, ज्यामध्ये स्वामीनारायण मंदिर वासना संस्थेच्या भिंतींवर भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात द्वेषपूर्ण घोषणा लिहिलेल्या दिसतात. खलिस्तानी दहशतवादी जर्नेल सिंग भिंद्रनवालेचे नावही भिंतींवर लिहिलेले आहे. हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने ट्विटरवर (एक्स) म्हटले आहे की, 'इथे हिंदूंना लक्ष्य करणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी भिंद्रनवालेचा उल्लेख आहे. हे कृत्य मंदिरात जाणाऱ्यांना दुखावण्याच्या आणि द्वेषाच्या गुन्ह्याच्या कक्षेत येणाऱ्या हिंसाचाराची भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने केले गेले आहे.'

दरम्यान, फाउंडेशनने नेवार्क पोलिसांना या घटनेचा द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून तपास करण्याचे आवाहन केले आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'कॅलिफोर्नियातील नेवार्क येथील स्वामीनारायण मंदिर वासना संस्थेच्या भिंतींवर खलिस्तान समर्थक घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. नेवार्क पोलिस आणि नागरी अधिकारांना सूचित केले गेले आहे आणि ते संपूर्ण तपास करतील. आमचा भर आहे की याचा द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून तपास झाला पाहिजे.' या घटनेबाबत स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचवेळी, नेवार्क पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे सांगितले.

अमेरिका आणि कॅनडामध्ये अशा घटना वाढल्या

अमेरिका आणि कॅनडामध्ये यापूर्वीही हिंदू मंदिरांशी छेडछाड झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: कॅनडात मंदिरांची तोडफोड आणि त्यांच्या भिंतींवर लिहिलेल्या खलिस्तान समर्थक घोषणांच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या ऑगस्टमध्ये बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टिसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील मेट्रो स्टेशनवर खलिस्तान समर्थक घोषणा लिहिल्या होत्या. जी-20 शिखर परिषदेपूर्वी ही घटना घडली. SFI ने दिल्ली मेट्रो स्थानकांचे फुटेज देखील जारी केले जिथे 'दिल्ली बनेगा खलिस्तान' आणि 'खलिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा लिहिल्या होत्या. सप्टेंबरमध्ये या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती, तर आणखी एका आरोपीला काही दिवसांनी ताब्यात घेण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: आमदार मायकल लोबोंच्या रेस्टॉरंटमध्ये चोरी, रोकड घेऊन चोरटे फरार

Chandreshwar Temple: प्राचीन चंद्रेश्वर मंदिर स्थळाची पाहणी करा! गोवा खंडपीठाचा आदेश; सौंदर्यीकरणाच्या नावावर डोंगरकापणीचा आरोप

Bhudargad Accident: गोव्याहून नेपाळकडे जाणाऱ्या बसचा अपघात! चालकाचे नियंत्रण जाऊन घुसली शेतात; 2 प्रवासी गंभीर जखमी

Horoscope: पैशाचा पाऊस पडणार, परदेशी जाण्याची संधी; 'या' राशींचे बदलणार भविष्य

Vinorda Theft: दरवाजा तोडला, दागिने-रोकड लंपास; दिवसाढवळ्या घरफोडीमुळे विर्नोड्यात खळबळ

SCROLL FOR NEXT