Hidden cameras found in school washroom in Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानमधील गंधी बात, शाळेच्या वॉशरुममध्ये सापडले छुपे कॅमेरे

छुप्या कॅमेऱ्यांद्वारे महिलांचे रेकॉर्डिंग होत असल्याची पुष्टी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानातील एका शाळेने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा पार केल्या असे म्हणायला हरकत नाही. वास्तविक, कराचीतील एका खासगी शाळेच्या वॉशरूममध्ये अनेक छुपे कॅमेरे सापडले आहेत. या घटनेनंतर सिंधच्या शिक्षण विभागाने शाळेची नोंदणी रद्द केली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिक्षण विभागाने याप्रकरणी शाळा प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस देण्यास सांगितले आहे. पाकिस्तानात यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.

शिक्षण विभागाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेत असे म्हटले आहे की, सीसीटीव्ही कॅमेरे पुरुषांच्या वॉशरूममध्ये, महिला शिक्षिका आणि विद्यार्थींच्या कॉमन वॉशरूममध्ये गुप्तपणे लावले होते. छुप्या कॅमेऱ्यांद्वारे महिलांचे रेकॉर्डिंग होत असल्याची पुष्टी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. अनेक महिलांनी स्वच्छतागृहांमध्ये कॅमेरे नसल्याची माहिती विभागाला दिली होती. दुसरीकडे, हे प्रकरण उघडकीस आल्यावर शाळा प्रशासनाने स्पष्टीकरण दिले असून, वॉशरूममधील कॅमेरे 'निगराणीच्या उद्देशाने' बसवण्यात आले होते, असे सांगितले जाते आहे.

चौकशी होईपर्यंत शाळेची नोंदणी स्थगित राहील

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिक्षण विभागाच्या अधिसूचनेनुसार, चौकशी पूर्ण होईपर्यंत शाळेची नोंदणी निलंबित केली जाईल. या प्रकरणाबाबत फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (FIA) सिंध सायबर क्राइम झोनचे प्रमुख इम्रान रियाझ यांनी सांगितले की, रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओबाबत अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. सायबर क्राइम सर्कलचे महासंचालक या प्रकरणाबाबत शाळेच्या संपर्कात आहेत, एफआयएचे एक पथक शाळेत तपासासाठी पाठवले जाईल असे रियाझ यांनी सांगितले. हे व्हिडीओ चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी चित्रित करण्यात आले होते की त्यामागे आणखी काही हेतू होता, याचा तपास टीम करत आहे.

पालक आणि स्थानिक लोकांनी शाळेविरोधात निदर्शने केली

हॅरेक्स स्कूल कराचीमधील चपल सन सिटी येथे आहे. या शाळेबाबत पालक व शिक्षकांच्या वतीने यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्या काळात कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. स्वच्छतागृहांमध्ये कॅमेरे बसवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी या घटनेची माहिती मिळताच शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी व स्थानिक नागरिकांनी शाळा प्रशासनाविरोधात निदर्शने केली. या घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT