ह्युस्टन. अमेरिकेच्या दक्षिणेकडील टेक्सास राज्यातील ह्यूस्टन येथे सुरू असलेल्या अॅस्ट्रोवर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हलदरम्यान (Astroworld Music Festival) किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ह्यूस्टन अग्निशमन विभागाचे प्रमुख सॅम्युअल पेन्या यांनी अपघाताची माहिती देताना सांगितले की, ही घटना रात्री 9 च्या सुमारास घडली, जेव्हा लोक स्टेजकडे जाण्यासाठी एकमेकांना धक्काबुक्की करू लागले. तेव्हा अचानक आग लागली.
'आम्हाला सुरुवातीच्या चौकशीत कळले आहे की, लोकांची ही गर्दी स्टेजच्या दिशेने जात होती, त्यामुळे लोक एकमेकांना ढकलून पुढे जावू लागले होते. आणि या चेगराचेंगरीत अनेक लोकांचे जीव गेले.आणि अनेक जण जखमीही झाले. त्याचबरोबर सुमारे 17 लोकांना रुग्णालयात नेण्यात आले असून त्यापैकी 11 जणांना हृदयविकाराच्या झटक्याच लक्षणही आढळून आले आहे. या दुर्घटनेत किमान आठ जणांचा मृत्यू आणि काही लोक जखमी झाल्याची माहिती दिली आहे. मृतांची वैद्यकीय तपासणी पूर्ण होईपर्यंत मृत्यूच्या कारणाबाबत निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही, अशी माहिती सॅम्युअल पेन्या यांनी दिली.
रॅपर ट्रॅव्हिस स्कॉटच्या अॅस्ट्रोवर्ल्ड फेस्टिव्हलमध्ये सुमारे 50,000 लोकांनी गर्दी केली होती. ह्युस्टन पोलिसांनी सांगितले की, ते इतक्या मोठ्या संख्येने लोकांचे मृत्यू कसे झाले याचे कारण शोधत आहेत आणि यासाठी संगीत क्षेत्राचे व्हिडिओ फुटेज देखील तपासले जात आहेत. या ठिकाणी काही मिनिटांत अचानक पोलिसांना अनेक लोक जमिनीवर पडलेले दिसले. त्यांना हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण आढळून आले असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर हा म्युझीक कॉन्सर्ट थांबवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Astroworld हा अमेरिकन रॅपर ट्रॅव्हिस स्कॉटने आयोजित केलेला संगीत महोत्सव आहे, जो पहिल्यांदा 2018 मध्ये सुरू झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.