फ्लोरिडामधील (Florida) मियामी बीचवर जलतरणपटू तसेच सूर्यस्नान करणाऱ्यांच्या जवळ हेलिकॉप्टर अटलांटिक महासागरात (Atlantic Ocean) कोसळले तेव्हा मोठ्या संख्येने लोक तिथे उपस्थित होते. फेडरल एजन्सी हेलिकॉप्टरच्या क्रॅशचा तपास करत आहेत, ज्यामध्ये तीन प्रवासी होते, अशी बातमी रॉयटर्सने दिली आहे. (Helicopter drowns in Atlantic Ocean)
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने सांगितले की, स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:20 वाजता रॉबिन्सन R44 हेलिकॉप्टर गर्दीच्या समुद्रकिनाऱ्याजवळ समुद्रात कोसळले आहे. एजन्सी नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डासोबत अपघाताच्या कारणाचा तपास चालू आहे.
मियामी बीच पोलिसांनी ट्विटरवरती सांगितले की त्यांना दुपारी 1:10 वाजता (1810 GMT) अपघाताबाबत कॉल आला.
अपघाताच्या व्हिडिओ फुटेजमध्ये हेलिकॉप्टर जलतरणपटूंनी (Swimmers) भरलेल्या भागात सरासर डुबकी मारताना दिसत आहे.
मियामी बीच पोलिस आणि अग्निशमन विभागांनी घटनास्थळाला प्रतिसाद दिला आणि ट्विटरवर सांगितले की दोन प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात "स्थिर स्थितीत" नेण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.