Hafiz Salam Bhuttavi| Mumbai Attack 26/11|Hafiz Saeed Dainik Gomantak
ग्लोबल

26/11 हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या भुट्टावीच्या मृत्यूवर UNSC कडून शिक्कामोर्तब

Ashutosh Masgaunde

Hafiz Salam Bhuttavi, a founding member of terrorist organization Lashkar-e-Taiba and Hafiz Saeed's aide, has died, UNSCouncil has confirmed Bhuttavi's death:

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक सदस्य आणि हाफिज सईदचा सहायक हाफिज सलाम भुट्टावी याचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने भुट्टावीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

ही माहिती संयुक्त राष्ट्रांच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात आली आहे. त्यानुसार २९ मे २०२३ रोजी पंजाब प्रांतातील मुरीदके येथे पाकिस्तान पोलिसांच्या ताब्यात असलेल्या भुट्टावीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

हाफिजचा सहायक असलेल्या भुट्टावी याने २६/११ च्या मुंबई हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात मदत केली होती.

अल-कायदाशी असलेल्या संबंधांमुळे 2012 मध्ये या दहशतवाद्याला पहिल्यांदा UNSC वॉन्टेड लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. भुट्टावी अल-कायदाला निधी पुरवणे, दहशतवादी कारवायांचे नियोजन, सुविधा, प्रशिक्षण आदी कामात गुंतला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हाफिज सईदला ताब्यात घेण्यात आले तेव्हा भुट्टावीने किमान दोन वेळा एलईटीचा लष्कर-ए-तैयबाचा म्हणून काम केले होते.

2008 मध्ये मुंबई हल्ल्यानंतर लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख सईदला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्याला पाकिस्तान सरकारने जून 2009 पर्यंत कोठडीत ठेवले होते.

सईदच्या अनुपस्थितीत भुट्टावीने लष्कर-ए-तैयबाची कमान सांभाळली होती. भुट्टावीच्या मृत्यूची बातमी गेल्या वर्षी मे महिन्यात आली असली तरी त्याला दुजोरा मिळू शकला नव्हता. आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या वेबसाइटवर त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

77 वर्षीय भुट्टावीला ऑक्टोबर 2019 मध्ये दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणी तुरुंगात पाठवण्यात आले होते. लाहोरपासून 60 किमी अंतरावर असलेल्या शेखूपुरा तुरुंगात तो कैदेत होता. 29 मे 2023 रोजी त्याला अचानक छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT