NIA Raids: 5 राज्यांमध्ये 32 ठिकाणी NIAची छापेमारी, खलिस्तानी गॅंगस्टर्सचे मोडणार कंबरडे!

National Investigation Agency: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) देशातील पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 32 ठिकाणी छापे टाकले.
NIA Raids
NIA RaidsDainik Gomantak
Published on
Updated on

National Investigation Agency: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) देशातील पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 32 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईद्वारे एनआयएने लॉरेन्स बिश्नोई आणि खलिस्तान्यांना मोठा झटका दिला आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि चंदीगडमध्ये 32 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. या छाप्यात एजन्सीने आरोपींकडून 4.60 लाख रुपये रोख, दोन पिस्तूल आणि दोन मॅगझीन जप्त केले आहेत. याशिवाय, तपासाशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. एनआयएने दहशतवादी आणि गॅंगस्टर यांच्यातील संबंधाप्रकरणी नोंदवलेल्या तीन प्रकरणांमध्ये ही छापेमारी केली. बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) आणि लॉरेन्स बिश्नोई गॅंगशी संबंधित खलिस्तानी दहशतवाद्यांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेले नेटवर्क

दरम्यान, हे नेटवर्क भारतातील विविध राज्यांमध्ये केवळ दहशतच पसरवत नाही तर पाकिस्तानमधून शस्त्रास्त्रे आणि ड्रग्जच्या तस्करीमध्येही गुंतलेले आहे. हे नेटवर्क गुन्हेगारीच्या दुनियेतून कमावलेला पैसाही वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवत आहे जेणेकरुन या पैशाचा वापर नेटवर्क वाढवण्यासाठी करता येईल. एजन्सीने नोंदवलेल्या तीन प्रकरणांमध्ये, पहिल्या प्रकरणात, यूएपीए अंतर्गत घोषित दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा आणि लखबीर सिंग संधू आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या विरोधात 16 ठिकाणी छापे टाकण्यात आले. हे दोन्ही दहशतवादी बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित असून देशाबाहेर बसून त्यांच्या नेटवर्कद्वारे देशात दहशतवादी घटना घडवण्यात गुंतलेले आहेत.

NIA Raids
खलिस्तानी दहशतवादी पन्नूवर NIA ची मोठी कारवाई; एअर इंडियाचे विमान उडवण्याची दिली होती धमकी!

पाकिस्तानात दहशतवादी बसले आहेत

हे लोक पाकिस्तानमध्ये बसलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतात शस्त्रास्त्रांची तस्करी करत आहेत. विशेष म्हणजे, या तस्करीसाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. याशिवाय, हे लोक एमटीएसएस-मनी ट्रान्सफर सर्व्हिस स्कीमद्वारे देशातील दहशतवाद्यांना परदेशातून पैसे पाठवत आहेत, जेणेकरुन देशात दहशतवादी घटना घडवता येतील. याशिवाय, आणखी एका प्रकरणात एजन्सीने 7 ठिकाणी गॅंगस्टरच्या लपलेल्या ठिकाणांवर छापे टाकले जे संघटितपणे त्यांची टोळी चालवत होते आणि गुन्हेगारी कारवाया करत होते. या टोळीने दिल्ली एनसीआर व्यतिरिक्त पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि यूपीमध्ये एक मोठी टोळी बनवली आहे आणि ते एकत्रितपणे गुन्हेगारी कारवाया करत आहेत.

NIA Raids
Jammu and Kashmir मध्ये NIA ची मोठी कारवाई, पाकिस्तानी नागरिकासह दोन आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल!

गोल्डी ब्राररच्या सहकार्याने नेटवर्क चालू आहे

दरम्यान, या टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई असून तो कॅनडामध्ये बसलेल्या दहशतवादी गोल्डी ब्राररच्या सहकार्याने हे नेटवर्क चालवत आहे. ही टोळी माफियाप्रमाणे काम करत असून बब्बर खालसा दहशतवादी हरविंदर सिंग याच्या सहकार्याने दहशतवादी घटना घडवत आहे, ज्यामध्ये दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवणे, त्यांना लपण्याची ठिकाणे उपलब्ध करुन देणे आणि शूटर पुरवणे यांचा समावेश आहे.

दुसरीकडे, या टोळीने पंजाबी गायक सिद्दू मूसेवाला आणि प्रदीप कुमार सारख्या लोकांची हत्या केली जेणेकरुन लोकांना त्यांच्या भीतीपोटी बेकायदेशीर मागण्या मान्य करण्यास भाग पाडले जाईल. त्याचप्रमाणे या टोळ्या मोठ्या व्यावसायिक आणि कलाकारांसह लोकांकडून केवळ पैसेच उकळत नाहीत तर ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरत होते. याशिवाय, तिसर्‍या प्रकरणात एजन्सीने देश-विदेशात पसरलेल्या या दहशतवादी-गँगस्टरच्या नेक्ससशी जोडलेल्या आणि या नेटवर्कसाठी काम करत असलेल्या 9 ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये या संस्थेला मदत करणाऱ्या आरोपींची ओळख पटवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com