Vladimir Putin News, Putin's girlfriend news, Putin's secret girlfriend News Dainik Gomantak
ग्लोबल

पुतीन यांची सीक्रेट गर्लफ्रेंड स्वित्झर्लंडमध्ये?

रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या सिक्रेट गर्लफ्रेंडबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या सिक्रेट गर्लफ्रेंडबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुतिन यांची कथित मैत्रीण आणि माजी जिम्नॅस्ट अलिना काबाएवा स्वित्झर्लंडमध्ये (Switzerland) असल्याचा दावा केला जात आहे. रशिया (Russia), युक्रेन (Ukraine) आणि बेलारुसमधील लोकांनी अलिनाच्या विरोधात ऑनलाइन मोहीम सुरु केली असून तिला स्वित्झर्लंडमधून हद्दपार करण्याची मागणी केली आहे. (Gymnast Alina Kabaeva Vladimir Putin's secret girlfriend is claimed to be in Switzerland)

दाव्यानुसार, अलिना तिच्या तीन मुलांसह एका आलिशान व्हिलामध्ये लपून बसली आहे. या याचिकेच्या समर्थनार्थ आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. अलिना 38 वर्षांची असून ती ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आहे. अलिना रशियात चांगलीच लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे अलिना पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाच्या खासदारही राहिल्या आहेत. (Putin's secret girlfriend News)

डिसेंबर 2021 मध्ये शेवटचे पाहिले

याचिकेत म्हटले आहे की, युद्ध असूनही स्वित्झर्लंडने पुतिन यांच्या कथित मैत्रिणीचे वास्तव्य कायम ठेवले आहे. युक्रेनमधील युद्धादरम्यान अलीनाला स्वित्झर्लंडला पाठवण्यात आल्याच्या वृत्तांदरम्यान ही याचिका आली आहे. अलिना 7 वर्षांहून अधिक काळ रशियन सरकार समर्थित नॅशनल मीडिया ग्रुपच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षाही राहील्या आहेत. डेली मेलच्या वृत्तानुसार, तिला दरवर्षी सुमारे 8 दशलक्ष युरो पगार मिळत आहे. अलिना सार्वजनिक ठिकाणी क्वचितच दिसते. डिसेंबर 2021 मध्ये मॉस्कोमध्ये झालेल्या डिव्हाईन ग्रेस रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ती शेवटची दिसली होती. 2004 च्या ऑलिम्पिकमध्ये तिने रिदमिक जिम्नॅस्टमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. द गार्डियन सारख्या अनेक वृत्तपत्रांनी अलिना पुतिन यांची मैत्रीण असल्याचा दावा केला आहे. मात्र, पुतिन यांनी हे कधीच जाहीरपणे मान्य केलेले नाही.

अलिनाबरोबर जवळीकीची चर्चा

पुतीन आणि आलिनाच्या कथित संबंधाबद्दल बातम्या अनेकदा मीडियात येतात. अलिना एक रशियन राजकारणी, मीडिया मॅनेजर आणि निवृत्त रिदमिक जिम्नॅस्ट आहे. अलिना ही आतापर्यंतची सर्वात यशस्वी जिम्नॅस्ट मानली जाते. तिने आपल्या कारकिर्दीत 2 ऑलिम्पिक पदके, 14 जागतिक चॅम्पियनशिप आणि 21 युरोपियन चॅम्पियनशिप पदके जिंकली आहेत.

शिवाय, पुतिन यांचे अनेक महिलांशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये सुवर्णपदक जिंकणारी जिम्नॅस्ट एलिना काबेबा हिचे नाव पहिल्यांदा येते. अफवा अशी आहे की, पुतिन यांना त्यांची मैत्रीण अलिना काबाएवासोबत तिसरी मुलगी देखील आहे. परंतु याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. रशियन मीडियाने 18 वर्षीय एलिझाबेथ क्रिव्होनोगिखचा उल्लेख पुतीन यांची सिक्रेट मुलगी म्हणून केला आहे. पुतीन यांच्या सिक्रेट मुलीबाबत, ब्रॅडफोर्ड विद्यापीठ, यूकेमधील व्हिज्युअल कम्प्युटिंग सेंटरचे संचालक प्रा. हसन उगेल म्हणाले होते की, पुतीन आणि त्यांच्या कथित मुलीचे चेहरे इतके सारखे आहेत की, दोघे वडील आणि मुलगी असल्याचे कोणीही नाकारु शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tribal History: देवळात प्रवेश नाकारला, तर स्वतःची मंदिरे उभारली! गोव्यातील आदिवासी समाजाच्या जिद्दीची आणि अस्मितेची कहाणी

Cricketer Banned: टी-20 स्पर्धेदरम्यान कोकेनचे सेवन, ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डोप टेस्टमध्ये फसला; क्रिकेट खेळणाऱ्यावर बंदी

Jharkhand Accident: झारखंडमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकनं लोकांना चिरडलं; 3 महिला, 3 बालकांसह 7 जणांचा मृत्यू VIDEO

Goa Politics: गोव्यात शिंदेंची निवडणूक मोर्चेबांधणी! 3 कार्यालये सुरू, तालुकावार समित्या; डिसेंबरमध्ये पदाधिकारी मेळावा

Government Employee Transfers: तलाठी, लिपिक, शिपाई आता राज्यभर बदलीसाठी पात्र? सावंत सरकारकडून 'कॉमन केडर' लागू

SCROLL FOR NEXT