Guatemala Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Guatemala Accident: ग्वाटेमालात भीषण अपघात! बस दरीत कोसळल्याने 55 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Guatemala Accident News: ग्वाटेमालाच्या राजधानीपासून काही अंतरावर भीषण अपघात झाला. ज्यामध्ये 55 जणांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Guatemala Accident: ग्वाटेमालाच्या राजधानीपासून काही अंतरावर भीषण रस्ते अपघात झाल्याचे घटना समोर आली, ज्यामध्ये 55 जणांचा मृत्यू झाला. बस दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी (10 फेब्रुवारी) ही थरकाप उडवणारी घटना घडली. ग्वाटेमालाच्या सार्वजनिक मंत्रालयाच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, 53 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सॅन जुआन डी डायओस रुग्णालयात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला.

दुसरीकडे, अग्निशमन दलाचे प्रवक्ते एडविन व्हिलाग्रान यांनी सांगितले की, पहाटेच्या आधी अनेक वाहनांच्या अपघातामुळे (Accident) बस रस्त्यावरुन पुलाखाली असलेल्या खोल दरीत कोसळली. ज्यामध्ये 55 जणांचा मृत्यू तर इतर काही प्रवासी गंभीर जखमी झाले. बस 1145 फूट (35 मीटर) खोल दरीत कोसळली. ही बस राजधानीच्या ईशान्येकडील प्रोग्रेसो येथून आली होती. मृत्यू झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. ग्वाटेमालाचे राष्ट्राध्यक्ष बर्नार्डो अरेव्हालो यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून राष्ट्रीय शोक दुखवटाही जाहीर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT