International Flights Closed Dainik Gomantak
ग्लोबल

DGCAचा मोठा निर्णय! 'या' तारखेपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हॅरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारतानं आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर घातलेले निर्बंध आणखी वाढवले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. कोविड-19 च्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानवाहतुकीवरची (International flights closed) बंदी आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत कायम करणार असल्याचं या परिपत्रकात म्हटलं आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ही बंदी पुन्हा वाढवण्याची शक्यता देखील वर्तवली गेली होती. अखेर तो निर्णय घेण्यात आला आहे. पण या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय मालवाहक विमान सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. 'डीजीसीए'नं मंजूर केलेल्या फ्लाइट्सनादेखील हा निर्णय लागू नसेल. यासोबतच 'एअर बबल'अंतर्गत (Air Bubble) असलेल्या विमानवाहतुकीवर बंदी घालण्यात येणार नाही, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. यापूर्वी 'डीजीसीए'ने 31 जानेवारी 2022 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर 23 मार्च 2020 पासून भारतातून होणारी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद आहे. तथापि, जुलै 2020 पासून सुमारे 28 देशांसोबत झालेल्या एअर बबल करारांतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू आहे. कोरोना पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत या नियमांचं काटेकोर पणे पालन करावं लागेल, असं सरकारचं म्हणणं आहे.

कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) आणि विमान इंधनाच्या (Fuel) दरात झपाट्यानं होत असलेल्या वाढीमुळे चालू आर्थिक वर्षात विमान कंपन्यांचा तोटा 20,000 कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो. 'क्रिसिल'च्या म्हणण्यानुसार, या आर्थिक वर्षात विमान कंपन्यांची वाटचाल 20,000 कोटी रुपयांच्या म्हणजेच आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या निव्वळ तोट्याकडे (Loss) होत आहे. गेल्या आर्थिक वर्षातल्या 13,853 कोटी रुपयांच्या तुलनेत हा तोटा 44 टक्क्यांनी अधिक आहे. किमान 2022-23 पर्यंत तरी विमान कंपन्या यातून सावरू शकत नाहीत, असा इशारा देशांतर्गत विमान वाहतुकीत 75 टक्के वाटा असणाऱ्या इंडिगो, स्पाइसजेट आणि एअर इंडिया या कंपन्यांवर आधारित अहवालात देण्यात आला आहे.

देशात गेल्या 24 तासांत 2,82,970 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या कालावधीत कोरोनामुळे 441 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हॅरिएंटचे (Omicron Variant) 8961 रुग्ण देशात आढळले आहेत. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) 15.13 टक्के आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patients) संख्या वाढून 18,31,000 वर पोहोचली आहे. ही संख्या गेल्या 232 दिवसांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: व्‍हिडिओ व्‍हायरल करण्‍याची धमकी देणाऱ्या तरुणास अटक; असाहाय्य माय-लेकींवर अत्‍याचार

St Estevam Accident: 'सांतइस्तेव प्रकरण' पोहोचणार मंत्रालयात? नातेवाईकांचे देवालाही साकडे

Bhutani Infra: ‘मेगा प्रोजेक्ट’ चे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे; 'भूतानी’ला भाजप सरकारचीच परवानगी असा काँग्रेसचा दावा

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT