Georgia And Russia Dainik Gomantak
ग्लोबल

Georgia And Russia: चक्क राष्ट्रपतींनाच विमानसेवा वापरण्यास बंदी, 'या' देशातील एअरलाइनचा अजब निर्णय

जॉर्जियाच्या राष्ट्रपती सलोम झौराबिचविली यांनी रशियाला विमानसेवा पुन्हा सुरू केल्यास त्या जॉर्जियन एअरलाइनवर बहिष्कार टाकू असे म्हणाल्या होत्या.

गोमन्तक डिजिटल टीम

Georgia And Russia: युरोपीय देश जॉर्जियाच्या राष्ट्रीय विमान कंपनी जॉर्जियन एअरवेजने आपल्याच राष्ट्रपतींना विमान प्रवास करण्यास बंदी घातली आहे. जॉर्जियाच्या राष्ट्रीय विमान कंपनी जॉर्जियन एअरवेजच्या संस्थापकाने देशाच्या राष्ट्रपतींना त्यांची विमान वापरण्यास बंदी घातली आहे. असे वृत्त रशियाची वृत्तसंस्था TASS ने दिले आहे.

जॉर्जियाच्या राष्ट्रपती सलोम झौराबिचविली यांनी रशियाला विमानसेवा पुन्हा सुरू केल्यास त्या जॉर्जियन एअरलाइनवर बहिष्कार टाकू असे म्हणाल्या होत्या.

रशियाने या महिन्यात जॉर्जियासह थेट उड्डाणांवर चार वर्षे जुनी बंदी उठवत आहे, अशी घोषणा केली. इतकेच नाही तर रशियाने जाहीर केले की ते रशियाला जाणाऱ्या जॉर्जियन लोकांसाठी अनेक दशके जुनी व्हिसाची अटही रद्द केली आहे. जॉर्जियाच्या राष्ट्रपती सलोमे झौराबिचविली यांनी जॉर्जियन अधिकाऱ्यांना रशियन उपक्रम हाणून पाडण्याचे आवाहन केले.

झौराबिचविली जोपर्यंत जॉर्जियन लोकांची माफी मागत नाही तोपर्यंत बंदी कायम राहील असे, खाजगी मालकीच्या जॉर्जियन एअरवेजचे संस्थापक तामाझ गायशविली यांनी रविवारी रशियन न्यूज एजन्सी TASS ला सांगितले.

जरी जॉर्जियन अधिकार्‍यांनी उड्डाणे पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असले तरी, काही प्रो-ईयू जॉर्जियन लोकांनी रविवारी मध्य तिबिलिसीमध्ये निषेध केला. जॉर्जियामधील एक गट रशियाशी कोणत्याही प्रकारच्या संबंधांना विरोध करते. त्याच्या सहयोगी सैन्याने अबखाझिया आणि दक्षिण ओसेशियाच्या काही भागांवर नियंत्रण ठेवले आहे.

पण, इतर जॉर्जियन रशिया समर्थक आहेत आणि मॉस्कोशी संबंध सुधारण्याच्या त्यांच्या सरकारच्या प्रयत्नांना समर्थन देतात. यामुळेच जॉर्जियाने युक्रेन युद्धात रशियावर निर्बंध लादण्यास नकार दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

SCROLL FOR NEXT