Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: अन्न,पाणी आणि विजेविना गाझाची होरपळ, जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद

Israel-Hamas War: मोहम्मद डेफ हा एक रहस्यमय व्यक्ती आणि इस्रायलचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. त्याच्याबद्दल कोणतीही बातमी नाही. व्हीलचेअरवर खिलेला नेता 2002 पासून हमासच्या लष्करी शाखेचा नेता आहे.

Ashutosh Masgaunde

Gaza is starving without food, water and electricity, supplies of essential goods cut off:

सध्या पॅलेस्टाईन आणि इस्त्रायल यांच्यात तणावाचे वातावरण आहे. याच दरम्यान गाझामधील वीजनिर्मिती प्रकल्पातील इंधन संपले असल्याने तेथील वीज निर्मिती बंद झाली आहे. बीबीसी च्या वृत्तानुसार शनिवारी हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने गाझाला घेरले आहे. त्यामुळे आता गाझामध्ये जनरेटरच्या सहाय्याने वीज उपलब्ध करावी लागत आहे.

तसेच गाझामध्ये वीज, जेवण, पाणी यांचा पुरवठा ठप्प झाला आहे. इस्त्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार गाझामध्ये त्यांना दिलेले मिशन पूर्ण करण्यासाठी लाखो सैनिक सज्ज आहेत.

सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत गाझा पावर ऑथरिटीचे प्रमुख गलाल इस्माइल म्हणाले की, गाझामध्ये सध्या वीज नाही, गाझामध्ये लोक जनरेटरचा वापर करीत असल्याचे ते म्हणाले. तसेच वीजेचे काम करण्यासाठी असलेले जनरेटर बंद पडल्याने अडचणी येत आहेत.

पॉवर प्लॅंट बंद पडला आहे. जेव्हा दोनच दिवसांपूर्वी इस्रायल सरकारने हमासच्या इस्रायलवर अचानक केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पॅलेस्टिनी क्षेत्राला 'संपूर्ण वेढा' घातला असल्याचे सांगितले. यामुळे वीज, अन्न, इंधन आणि पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे.

समेह शौकरी यांनी गाझा पट्टीतील विदारक स्थिती पाहून इशारा दिला की, इजिप्त मदत करण्यास तयार आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र समितीचा पाठींबा असल्याचे सांगितले. हल्ल्याची पार्श्वभूमी बघता नागरिकांसाठी बाहेर पडण्यासाठी असणारा राफा क्रॉसिंग मार्ग इस्त्रायलने बंद केला आहे. जो इजिप्त द्वारा नियंत्रित नागरिकांसाठी जाण्याचा एकमेव मार्ग आहे. तसेच इजिप्तने मंगळवारी इस्त्रायलच्या हल्लानंतर क्रॉसिंग बंद केली आहे.

इस्रायल संरक्षण दलाने बुधवारी इस्रायल-हमास युद्धाच्या पाचव्या दिवशी गाझा पट्टीच्या अल फुरकान भागात २०० हून अधिक लक्ष्यांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या अनेक लक्ष्यांपैकी एक म्हणजे हमासचा लष्करी प्रमुख मोहम्मद डेफ.

मोहम्मद डेफ हा एक रहस्यमय व्यक्ती आणि इस्रायलचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. त्याच्याबद्दल कोणतीही बातमी नाही. व्हीलचेअरवर खिलेला नेता 2002 पासून हमासच्या लष्करी शाखेचा नेता आहे. मोसादने डीफला संपवण्यासाठी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु प्रत्येक वेळी तो थोडक्यात वाचला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT