Gagandeep Singh Sentenced 34 Years Dainik Gomantak
ग्लोबल

Crime News: 24 वर्षीय तरुणीचं अपहरण करुन दोनदा बलात्कार अन् अमानुष छळ, भारतीय वंशाच्या नराधमाला 34 वर्षांची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

Gagandeep Singh Sentenced 34 Years London: लंडनमधून भारतीय वंशाच्या एका व्यक्तीच्या विकृत आणि क्रूर कृत्याची धक्कादायक बातमी समोर आली.

Manish Jadhav

Gagandeep Singh Sentenced 34 Years London: लंडनमधून भारतीय वंशाच्या एका व्यक्तीच्या विकृत आणि क्रूर कृत्याची धक्कादायक बातमी समोर आली. एका 24 वर्षीय तरुणीचे अपहरण करुन, तिला डांबून ठेवत तिचा अमानुष छळ करणे आणि तिच्यावर दोनदा बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या गगनदीप सिंह या 38 वर्षीय व्यक्तीला लंडनच्या कोर्टाने तब्बल 34 वर्षांच्या तुरुंगवासाची कठोर शिक्षा सुनावली. या प्रकरणाची सुनावणी 'आयलवर्थ क्राउन कोर्टात' पार पडली.

कोर्टाने गगनदीपला अपहरण, बेकायदेशीररित्या डांबून ठेवणे, गंभीर दुखापत करणे आणि बलात्कार या सर्व गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले. या शिक्षेनुसार, गगनदीपला 28 वर्षे प्रत्यक्ष तुरुंगात घालवावी लागतील आणि त्यानंतरच्या 6 वर्षांच्या कालावधीत तो बाहेर आला तरी त्याच्यावर अत्यंत कडक पाळत ठेवली जाईल. तसेच, कमीत कमी 18 वर्षांची शिक्षा पूर्ण केल्याशिवाय त्याच्या पॅरोलच्या (जामीन) अर्जावर विचारही केला जाणार नाही.

हे संपूर्ण प्रकरण जून 2024 मध्ये सुरु झाले होते, जेव्हा पीडित तरुणीला थायलंडहून युनायटेड किंगडममध्ये एक सुटकेस आणण्यास सांगण्यात आले होते. परंतु, तिने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. या नकाराचा बदला घेण्यासाठी बर्मिंगहॅम विमानतळावर काही बुरखाधारी लोकांनी तिचे जबरदस्तीने अपहरण केले आणि तिला एका कारमध्ये टाकून पश्चिम लंडनच्या हनवेल भागातील एका घरात आणले. या घरात आरोपी गगनदीप सिंह याने तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला आणि तिला प्रचंड यातना दिल्या.

पीडितेचा छळ एका दिवसापेक्षा जास्त काळ सुरु होता. या काळात तिला बेदम मारहाण करण्यात आली, तिचे कपडे उतरवून तिला कोडे मारण्यात आले. या अंगावर काटा आणणाऱ्या छळानंतर आरोपीने तिला सोडून दिले, परंतु या धक्कादायक प्रकाराविषयी कोणालाही न सांगण्याची आणि पोलिसात गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या भयंकर प्रकारामुळे पीडित तरुणी प्रचंड घाबरली होती आणि सुरुवातीला पोलिसांना (Police) काहीही सांगण्यास धजावत नव्हती. मात्र, नंतर तिच्या आईने दिलेल्या धीरामुळे आणि पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे तिने हिंमत दाखवून तक्रार नोंदवली.

मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या 'नॉर्थ वेस्ट रेप अँड सिरियस सेक्सुअल ऑफेन्स युनिट'च्या डिटेक्टिव्ह कॉन्स्टेबल सीतारा अब्दुल यांनी या संपूर्ण तपासाचे नेतृत्व केले. कोर्टाच्या निकालानंतर बोलताना त्यांनी सांगितले की, या प्रकरणात पीडित तरुणीने ज्या अमानुष आणि अकल्पनीय छळाचा सामना केला, त्याची आपण कल्पनाही करु शकत नाही. आरोपीने तिच्यावर अशा प्रकारे नियंत्रण मिळवले होते की तिला स्वतःच्या जिवाची भीती वाटू लागली होती. परंतु, तिने अत्यंत बहादुरी दाखवत पुढे येऊन साक्ष दिली, ज्यामुळे आज या क्रूर हल्लेखोराला त्याच्या कर्माची योग्य ती शिक्षा मिळाली. या निकालामुळे लंडनमध्ये महिलांच्या सुरक्षेचा आणि अशा गंभीर गुन्ह्यांवरील कडक कारवाईचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT