French President Emmanuel Macron Video Dainik Gomantak
ग्लोबल

French President Emmanuel Macron Video: काही सेकंदातच फ्रान्सच्या अध्यक्षांनी संपवली बिअरची बॉटल; विरोधक म्हणाले...

French President Emmanuel Macron: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जातात.

Manish Jadhav

French President Emmanuel Macron Video: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे.

या व्हिडिओमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन अवघ्या 17 सेकंदात बिअरची बॉटल संपवतात. या व्हिडिओमुळे ते नव्या वादात सापडले आहेत. त्यांच्या या कृतीवर विरोधी पक्षाने निशाणा साधला आहे. ते अति 'मद्यपी' म्हणत टीकास्त्र डागत आहेत.

दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ रग्बी सामन्यानंतरचा आहे. यामध्ये अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासह संघाचे प्रशिक्षक स्टाफ आणि बाकीचे खेळाडूही उपस्थित आहेत. हे सर्व खेळाडू तिथे उपस्थित मॅक्रॉन यांचा उत्साह वाढवताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

दुसरीकडे, ग्रीन पार्टीच्या खासदार सॅंड्रीन रुसो यांनी ट्विटरवरुन मॅक्रॉन यांच्या हल्लाबोल केला. रुसो म्हणाले की, "एका फोटोमध्ये देशाचं नेतृत्व मद्यपी बनले आहेत." मॅक्रॉन यांच्या सेंट्ररिस्‍ट पक्षाचे खासदार जीन रेने कॅझेन्यूव्ह यांनी रुसो यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला. त्यांनी लिहिले की, 'एक राष्ट्रपती जो 23 खेळाडूंच्या आनंदात सामील होतो आणि त्यांच्या परंपरेचा भाग बनला आहे. बस्स एवढेच.'

मात्र, मॅक्रॉन हे क्रीडाप्रेमी असल्याचे मानले जाते. अनेकवेळा ते फ्रान्सच्या फुटबॉल संघाला सपोर्ट करताना आणि खेळाडूंना प्रेरित करताना दिसले आहेत. त्याचवेळी, अनेक आरोग्य तज्ञांनी मॅक्रॉन यांच्या या वर्तनावर टीका केली.

फ्रान्सच्या (France) राष्ट्राध्यक्षासारख्या सर्वोच्च पदावर ते विराजमान असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत मॅक्रॉन यांनी आदर्श म्हणून एक चांगले उदाहरण ठेवले पाहिजे. दुसरीकडे, काही लोकांचा असा विश्वास आहे की, या घटनेचा मॅक्रॉन यांच्या सार्वजनिक प्रतिमेला मोठी पोहोचवू शकते.

ते जनतेपासून खूप दूर गेले

मॅक्रॉन यांच्यावर अनेकदा आरोप केले जातात की, ते जनतेपासून खूप दूर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली आहे. त्यांच्या काही अलोकप्रिय धोरणात्मक निर्णयांमुळे मॅक्रॉन यांची लोकप्रियता या वर्षी सर्वकालीन नीचांकावर पोहोचली आहे.

फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षांमध्ये दारु पिण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण तरीही याच्या अतिसेवनामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात.

अमेरिकेवरील वक्तव्यामुळे चर्चेत आले

काही काळापूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चीनच्या (China) दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी अमेरिकेबाबत केलेल्या वक्तव्याने जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले होते. युरोपीय देशांनी अमेरिकेला हो म्हणू नये, असे मॅक्रॉन म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT