Russia Russia War Dainik Gomantak
ग्लोबल

फ्रान्सच्या अध्यक्षांनी पुतीन यांना फिरवला फोन; ताबडतोब युद्धाला विराम द्या

मॅक्रॉन यांनी पुतीन यांच्याशी फोनवरती 70 मिनिटे चर्चा केली आहे.

दैनिक गोमन्तक

रशियाने (Russia) युक्रेनवर (Russia) हल्ला केल्यापासून पाश्चिमात्य देश त्यांच्यावरती जोरदार टीका करत आहेत. त्याचबरोबर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी या संदर्भात अनेकदा चर्चा केली. त्यांनी पुन्हा एकदा पुतिन यांच्याशी संवाद साधला आहे. यादरम्यान, मॅक्रॉनने मारियुपोलचा वेढा उठवण्याची, मानवतावादी प्रवेशाची परवानगी देण्याचे आणि तात्काळ युद्धविराम करण्याचे आदेश देखील दिले आहेत. (French President Emmanuel Macron has had a 70 minute phone conversation with Russian President Vladimir Putin)

मॅक्रॉन यांनी पुतीन यांच्याशी फोनवरती 70 मिनिटे चर्चा केली आहे. तत्पूर्वी, पुतिन यांनी जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्याशी देखील चर्चा केली आहे, त्यांनी तात्काळ युद्धबंदीसाठीही दबाव आणला आहे.

फ्रान्सच्या अध्यक्षीय कार्यालयाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की मॅक्रॉन यांनी पुतीन यांच्याशी अनेकदा चर्चा केली आहे. नागरिकांवरती वारंवार होणारे हल्ले आणि युक्रेनमधील मानवाधिकारांचा आदर करण्यात रशिया अपयशी ठरल्याच्या तक्रारींचीही त्यांनी यावेळी नोंद घेतली आहे. पण पुतिन यांनी युक्रेनवरती युद्धाचा ठपका ठेवला आहे.

मॅक्रॉन म्हणाले की ते पुतिनशी बोलतात कारण त्यांचा विश्वास आहे की शांतता हा एकमेवच मार्ग आहे. युक्रेनचा प्रतिकार, कठोर पाश्चात्य निर्बंध देखील लागू आहेत, पण युद्धविराम थांबवण्यासाठी आता सर्व प्रयत्न व्हायला हवेत, असेही ते यावेळी म्हणाले.

याआधी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांच्याशीही चर्चा केली होती, ज्यामध्ये मॅक्रॉन यांनी रशियाला मदत करू नये, तसेच रशियाला अण्वस्त्रे बसवण्यासाठी आपली जमीन वापरू देऊ नये, असेही म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT