United Kingdom: सरकारने हटवले कोरोनामुळे लादलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध

युनायटेड किंगडम (United Kingdom) सरकारने शुक्रवारी उर्वरित सर्व COVID-19 संबंधी आंतरराष्ट्रीय निर्बंध संपवण्याची घोषणा केली आहे.
United Kingdom
United KingdomDainik Gomantak
Published on
Updated on

युनायटेड किंगडम (United Kingdom) सरकारने शुक्रवारी उर्वरित सर्व COVID-19 संबंधी आंतरराष्ट्रीय निर्बंध संपवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये आगमनापूर्वी पॅसेंजर लोकेटर फॉर्म भरणे आणि ज्या प्रवाशांना लस मिळालेली नाही त्यांच्यासाठी अनिवार्य स्क्रीनिंगचा समावेश आहे. सरकारने म्हटले आहे की, 'आम्ही अनेक आपत्कालीन उपाय राखून ठेवले आहेत. ज्यामुळे कोरोनाचा (Corona) इतर कोणताही धोकादायक व्हेरिएंट देशात येऊ नये यासाठी तातडीने आणि पुरेशी कारवाई करणे शक्य होईल.' (The United Kingdom government lifted the international sanctions imposed by Corona)

दरम्यान, देशाचे वाहतूक मंत्री रॉबर्ट कोर्ट्स (Robert Courts) म्हणाले की, 'देशात वाढणारा कोरोनाचा प्रसार रोखण्यात आम्ही यश मिळवले आहे.'

United Kingdom
United Nations: 'गृहयुद्धा' पासून मुक्ती मिळवणं हेच म्यानमारचं उद्दिष्ट!

आतापर्यंत, यूकेमध्ये केवळ लसीकरण (Vaccination) झालेल्या प्रवाशांनाच आरटी-पीसीआर चाचणीतून सूट देण्यात आली होती. ज्यांनी लसीकरण केले त्यांनी मायदेशात जाण्यापूर्वी चाचणी करणे आवश्यक होते. यूकेमध्ये आगमनानंतर दोन दिवसांनी पुन्हा चाचणी करण्यात येणार होती. कोरोना प्रसाराचा वेग कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com