Francis Halzen Physics Nobel Prize Dainik Gomantak
ग्लोबल

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Nobel Prize 2026: Francis Halzen Honoured for Neutrino Discovery: फ्रान्सिस हॅल्जेन यांना आइसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरीमधील त्यांच्या मोलाच्या योगदानासाठी 2026चा भौतिकशास्त्राचा प्रतिष्ठित नोबेल पुरस्कार जाहीर झाला.

Manish Jadhav

Francis Halzen Physics Nobel Prize: फ्रान्सिस हॅल्जेन यांना आइसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरीमधील त्यांच्या मोलाच्या योगदानासाठी 2026चा भौतिकशास्त्राचा प्रतिष्ठित नोबेल पुरस्कार जाहीर झाला. नोबेल समितीने आपल्या घोषणेत स्पष्ट केले की, हॅल्जेन यांनी न्यूट्रिनोसारख्या अत्यंत सूक्ष्म आणि सहजासहजी हाती न लागणाऱ्या कणांचा अभ्यास करण्यासाठी अंटार्कटिकच्या बर्फाचा एक विशाल डिटेक्टर म्हणून वापर करण्याची अभिनव कल्पना मांडली. त्यांच्या या दूरदृष्टीमुळेच दक्षिण ध्रुवावर 'आइसक्यूब' प्रोजेक्टची वैज्ञानिक पायाभरणी करणे शक्य झाले.

न्यूट्रिनो हे विद्युतदृष्ट्या न्यूट्रल असे सब-ॲटोमिक कण असतात, जे सामान्य पदार्थांमधून सहज निघून जातात. मात्र, जेव्हा एखादा न्यूट्रिनो अणूच्या न्यूक्लिअसवर आदळतो, तेव्हा त्या प्रक्रियेतून प्रकाशाचा एक क्षीण प्रकाशझोत निर्माण होतो. हे कण जेव्हा स्वच्छ अंटार्कटिक बर्फावरुन प्रवास करतात, तेव्हा आइसक्यूबचे अत्यंत संवेदनशील सेन्सर्स हा प्रकाशझोत सहज टिपून घेतात.

हा प्रोजेक्ट अखेर अंटार्कटिकमधील जवळपास एक घन किलोमीटर बर्फाचा परिसर व्यापणाऱ्या एका महाकाय डिटेक्टरच्या रुपात विकसित झाला. कॉस्मिक स्रोतांतून येणारे हाय-एनर्जी न्यूट्रिनो अत्यंत दुर्मिळ असतात, त्यामुळे या प्रोजेक्टचा आकार वैज्ञानिकांसाठी अत्यंत गरजेचा ठरला. आइसक्यूबने गोळा केलेल्या डेटाच्या आधारे शास्त्रज्ञांना विश्वातील वातावरणाचा अभ्यास करणे तसेच हाय-एनर्जी कॉस्मिक कणांचा उगम शोधणे शक्य झाले. या संशोधनामुळे अनेक अज्ञात खगोलीय रहस्यांचा उलगडा होण्यास मदत मिळणार आहे.

रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे दिला जाणारा हा नोबेल पुरस्कार भौतिकशास्त्र क्षेत्रासाठी खगोलशास्त्राचा एक नवीन मार्ग खुला करणारा ठरला. सध्या फ्रान्सिस हॅल्जेन हे अमेरिकेतील (America) विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नोबेल पुरस्काराचे स्वरुप 1 कोटी 20 लाख स्वीडिश क्रोनर इतकी रोख रक्कम असून, एकापेक्षा जास्त विजेते असल्यास ही रक्कम आपापसात वाटली जाते. हा जागतिक सन्मान सोहळा आगामी 10 डिसेंबर रोजी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे पार पडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT