Corona Wave in South Africa

 
Dainik Gomantak
ग्लोबल

'कोरोनाची चौथी लाटही ओसरली'

दक्षिण आफ्रिकेत लादलेले निर्बंध अखेर शिथिल

आदित्य जोशी

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची चौथी लाटही ओसरल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील निर्बंध आता शिथिल करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेत शनिवारपासून निर्बंध हटवल्याने तेथील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्येच (South Africa) ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यामुळे जगभरात चिंतेचं वातावरणही पसरलं होतं. मात्र आता निर्बंध हटवल्याने संपूर्ण जगभरात काहीसा दिलासा मिळाला आहे. देशातील कोरोनाची नियंत्रणात आलेली स्थिती, हॉस्पिटलमधील बेडची उपलब्ध क्षमता, लसीकरण या सर्व गोष्टींचा विचार करुन निर्बंध शिथिल केल्याचं दक्षिण आफ्रिका सरकारने स्पष्ट केलं आहे.

दिलासादायक गोष्ट अशी की दक्षिण आफ्रिका सरकारने असंही सांगितलं आहे की, इतर व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा दरही कमी होता. त्यामुळे ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धसका घेतलेल्या जगभरातील सर्वच देशांमध्ये काहीसं दिलासादायक वातावरण आहे.

दक्षिण आफ्रिकेत निर्बंध जरी शिथिल करण्यात आले असले तरीही मास्कची (Mask) सक्ती, सोशल डिस्टन्सिंगचं पालन बंधनकारक आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे वाढलेली रुग्णसंख्या ओसरु लागल्यानंतर निर्बंध (Restrictions) शिथिल करण्यात येत असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत तब्बल 35 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून सुमारे 90 हजारहून अधिक मृत्यू झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT