General Pervez Musharraf (Retd) passes away Dainik Gomantak
ग्लोबल

Pervez Musharraf Passes Away: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मुशर्रफ यांचे निधन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Pervez Musharraf Passes Away: पाकिस्तानचे माझी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांचे निधन झाले आहे. दुबईमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. परवेज मुशर्रफ हे गंभीर आजारांचा सामना करत होते.  मुशर्रफ 2001 ते 2008 या काळात पाकिस्तानचे अध्यक्ष होते. याआधी ते लष्करप्रमुखही होते. कारगिल युद्धासाठी परवेझ मुशर्रफ यांना थेट जबाबदार धरले जाते. त्यांनीच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मियाँ नवाझ शरीफ यांना पदच्युत केले.

  • दुबईत उपचार सुरू होते

मार्च 2016 मध्ये मुशर्रफ उपचारासाठी दुबईला (Dubai) गेले होते, तेव्हापासून ते तिथे उपचार घेत होते. याआधीही त्यांच्या मृत्यूच्या बातम्या अनेकवेळा आल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्या वृत्तांचे खंडन केले होते. प्रदीर्घ आजारपणात ते अनेकदा व्हेंटिलेटरवर होते. पण यावेळी त्यांनी जीवनाशी सुरु असलेली झुंज संपवली.

  • मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा, नंतर शिक्षा रद्द

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी राष्ट्राध्यक्षांना अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान, पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा लाहोर उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय दिला होता. देशद्रोहाच्या आरोपात इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली होती. विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय असंवैधानिक असल्याचे लाहोर उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुशर्रफ यांनी त्यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला लाहोर उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT