Former Afghan Vice President Amrullah Saleh has said he will not bow to the Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबानच्या विरोधात मैदानात उतरलेला Amrullah Saleh कोण?

Afghanistan: भुमिगत होण्यापूर्वी रविवारी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी ट्विटरच्या माध्यमातुन हे वक्तव्य करत आपण कधीही तालिबानसोबत जाणार नसल्याचे सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानचे (Afghanistan) उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह (Amrullah Saleh) यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, तालिबानने सरकार कमकुवत झाल्यानंतर राजधानी काबूलवर ताबा मिळवला. मात्र आपण शरण जाणार नाही. अमरुल्ला सालेह हे काबूलच्या ईशान्येकडील, पंजशीर व्हॅली या ठीकाणी प्रवास केरताना दिसले होते. भूमिगत होण्याआधी सालेह यांनी रविवारी ट्विटरवर लिहिले की, 'मला निवडलेल्या लाखो लोकांना मी निराश करणार नाही. मी कधीच तालिबानसोबत जाणार नाही.

दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो दिसुन आले होते, ज्यामध्ये माजी उपराष्ट्रपती आणि त्यांचे माजी मार्गदर्शक आणि तालिबानविरोधी कार्यकर्ते अहमद शाह मसूद यांच्या मुलासह ते पंजशीरमध्ये दिसत आहेत. हा परिसर हिंदुकुश पर्वताजवळ आहे. मिलिशिया फोर्सचे नेतृत्व करणारे सालेह आणि मसूद यांची मुले तालिबानचा मुकाबला करण्यासाठी गुरिल्ला वॉरफेअरसाठी पंजशीरमध्ये जमताना दिसुन आले आहेत.

पंचशीर खोरे हा असा भाग आहे जो, 1990 च्या गृहयुद्धात कधीच तालिबानच्या ताब्यात आला नव्हता. तसेच एक दशकापूर्वी (तत्कालीन) सोव्हिएत युनियनला देखील ते जिंकता आले नव्हते. आम्ही तालिबानला पंजशीरमध्ये प्रवेश करू देणार नाही, असे एका रहिवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आम्ही पुर्ण ताकदीने त्याला विरोध करू आणि लढू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT