Kozhikode Flight's Engine on Fire: अबुधाबीहून कोझिकोडला येणारे एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान इंजिनला हवेत आग लागली. घटनेची माहिती मिळताच विमान परत विमानतळावर उतरविण्यात आले. DGCA ने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी विमानात 184 प्रवासी होते.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. टेक ऑफ झाल्यानंतर लगेचच एका इंजिनमध्ये आग दिसू लागली. दरम्यान, विमान सुरक्षितपणे उतरले असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
एअर इंडिया एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, "टेक ऑफ केल्यानंतर विमान 1,000 फूट उंचीवर गेल्यानंतर, पायलटला इंजिनमध्ये आग लागल्याचे दिसले, त्यानंतर अबू धाबी विमानतळावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला."
एअर इंडिया एक्सप्रेस B737-800 विमान मध्यभागी आग लागल्याने अबू धाबी विमानतळावर परतले. अशी माहिती DGCA दिली आहे.
दरम्यान, यापूर्वी 23 जानेवारी रोजी, त्रिवेंद्रमहून मस्कतला जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान तांत्रिक बिघाडामुळे टेक ऑफ केल्यानंतर 45 मिनिटांनी मागे वळविण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. "उड्डाण त्रिवेंद्रम येथून सकाळी 8.30 वाजता उड्डाण केले आणि 9.17 वाजता परतले."
डिसेंबर 2022 मध्ये दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइटमध्ये साप आढळला होता. एअर इंडिया एक्स्प्रेसचे बोईंग बी-737 हे कालिकतहून दुबईला जाणारे विमान वेळापत्रकानुसार उड्डाण केले आणि दुबई विमानतळावर उतरल्यानंतर कर्मचार्यांनी विमानात साप असल्याची माहिती दिली. विमान वाहतूक नियामक संस्थेने या घटनेच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.