First death recorded by Ukrainian border guards in Ukraine Russia War Dainik Gomantak
ग्लोबल

युक्रेनच्या सीमा रक्षकांकडून पहिल्या मृत्यूची नोंद

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने 5 रशियन लढाऊ विमाने, 2 हेलिकॉप्टर वर हल्ला चढवला असुन, 2 टाक्या आणि अनेक ट्रक केले नष्ट

दैनिक गोमन्तक

युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यात पहिला बळी गेला असुन, युक्रेनच्या सीमा रक्षकांनी केलेल्या हल्ल्यात रशियाचा सैनिक मृत्युमुखी पडला आहे. रशियाचे भूदल अनेक दिशांनी युक्रेनमध्ये घुसले आहे. भारत हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर पर्यायी निर्वासन मार्ग शोधत आहे. नाटो प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी युक्रेन आक्रमणाचा आढावा घेण्यासाठी राजदूतांची बैठक बोलावली आहे. कारण अनेक सदस्य देश युक्रेनच्या सीमेवर आहेत. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने 5 रशियन लढाऊ विमाने, 2 हेलिकॉप्टर वर हल्ला चढवला असुन, 2 टाक्या आणि अनेक ट्रक नष्ट केले. (First death recorded by Ukrainian border guards in Ukraine Russia War)

अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम

या हल्ल्याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होत आहे. सेन्सेक्स 2033.32 अंकांनी घसरला असुन, सध्या 55,198.74 वर व्यापार करत आहे. निफ्टी 601.45 अंकांनी घसरला, सध्या 16,461.80 वर आहे. युक्रेनवर रशियाचा लष्करी हल्ला सातत्याने सुरु असून, युक्रेनमध्ये मोठा विध्वंस होत आहे. दरम्यान, परिस्थिती पाहता नाटो देशांनी (NATO Countries) रशियाविरोधात (Russia) कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे.

युक्रेनवर रशियाचा लष्करी हल्ला सातत्याने सुरु असून, युक्रेनमध्ये मोठा विध्वंस होत आहे. दरम्यान, परिस्थिती पाहता नाटो देशांनी (NATO Countries) रशियाविरोधात (Russia) कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाटोचे 30 सदस्य देश रशियावर हल्ला करण्याची योजना आखत आहेत. नाटो कलम-4 रशियाविरोधात वापरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. किंबहुना, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनविरुध्द (Ukraine) युद्ध पुकारल्यानंतरही हल्ले सुरुच आहेत. रशियाने एकाच वेळी युक्रेनच्या 11 शहरांवर हल्ला करुन तेथील लष्करी तळांवर मोठा विध्वंस केला आहे.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही या हल्ल्याचा निषेध केला

त्याचवेळी इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris johnson) यांनीही या हल्ल्याचा निषेध केला असून इंग्लंड आणि आमचे मित्र देश योग्य ते प्रत्युत्तर देतील, असे म्हटले आहे. याशिवाय जर्मनीची राजधानी असणाऱ्या बर्लिनमधील (Berlin) ब्रॅंडेनबर्ग गेटवरही युक्रेनच्या ध्वजासह एकता दाखवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT