Imran Khan Dainik Gomanatk
ग्लोबल

Imran Khan: इम्रान खान यांच्या ताफ्यावर गोळीबार, अनेकजण जखमी

Former Prime Minister Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.

दैनिक गोमन्तक

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, या गोळीबारात 4 जण जखमी झाले आहेत. डॉन न्यूज टीव्हीने गुरुवारी वृत्त दिले की, वजिराबादमधील अल्लाह हो चौकाजवळ PTI अध्यक्ष इम्रान खान यांच्या कंटेनरवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. मात्र, इम्रान खान या हल्ल्यात थोडक्यात बचावले. त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. तेहरीक-ए-इन्साफच्या (PTI) निषेध मोर्चाचा गुरुवारी सातवा दिवस आहे.

दरम्यान, इम्रान खान (Imran Khan) लाहोर ते इस्लामाबाद (Islamabad) पदयात्रा काढत आहेत. या मोर्चादरम्यान ते ज्या कंटेनरमध्ये होते, त्या कंटेनरजवळ गोळीबार झाला आहे. या हल्ल्यानंतर इम्रान खान यांना तात्काळ गाडीत बसवण्यात आले. हल्लेखोरांना पकडण्यात आले असले तरी अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

दुसरीकडे, इम्रान खान यांच्यावरील या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या (Pakistan) राजकारणात पुन्हा एकदा रक्तरंजित खेळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्यावरही एका रॅलीत आत्मघातकी हल्ला झाला होता, ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. सध्या त्यांचे पुत्र बिलावल भुट्टो हे पाकिस्तान सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री आहेत, ज्यांच्या विरोधात इम्रान खान यांनी आंदोलन सुरु केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

SCROLL FOR NEXT