Imran Khan's Long March: इम्रान खान यांच्या लाँग मार्चला लाहोरमधून सुरुवात

पाक सरकारविरोधात हकीकी आझादी मार्च; 380 किलोमीटरची यात्रा करून इस्लामाबादला पोहचणार
Imran Khan
Imran KhanDainik Gomantak

Imran Khan's Long March: पाकिस्तानातील सरकारविरोधात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या शुक्रवारी त्यांच्या हकीकी आझादी मार्चला लाहोरमधुन प्रारंभ झाला. 380 किलोमीटरचे अंतर कापून हा लाँग मार्च 4 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लाामाबाद येथे पोहचण्याची शक्यता आहे.

Imran Khan
Twitter's Indian Head: ट्विटरचे नेतृत्व करणाऱ्या 'या' भारतीयांविषयी माहिती आहे का?

लाहोरमध्ये इम्रान यांचा पक्ष 'पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ'च्या समर्थकांनी या मार्चसाठी गर्दी केली होती. येथे मार्चला सुरवात होण्यापुर्वी इम्रान यांनी उपस्थितांना संबोधितही केले. या पुर्वी इम्रान यांच्या पक्षाने एक व्हिडिओ ट्विट केला होता, त्यात आम्ही सर्व जिहादसाठी बाहेर पडलो आहोत, असे इम्रान म्हणाले होते. पक्षाने हा लाँग मार्च केनियात हत्या झालेले पत्रकार अरशद शरीफ यांना समर्पित केला आहे. कोणत्याही परिस्थिती हा लाँग मार्च यशस्वी करण्याचे इम्रान खान यांनी ठरवले आहे.

देशात निवडणुका घेण्याची मागणी करत हा मार्च काढला जात आहे. यात सहभागी होणाऱ्यांना गॅस मास्क, चादरी, अंथरून, पांघऱूण, कपडे, छोटे टेंट, काठी घेऊन येण्यास इम्रान यांच्या पक्षाने सांगितले आहे.

Imran Khan
North Korea tests Missile: किम जोंग उनची सटकली; बड्या देशांना फाट्यावर मारत पुन्हा डागले बॅलेस्टिक मिसाईल

एकप्रकारे भारतातील सुधारीत कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाप्रमाणे हे आंदोलन करण्याचा इम्रान यांचा मनोदय दिसतो. दरम्यान, पाकिस्तान सरकारने दीर्घपल्ल्याची पदयात्रा काढणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. राजधानी इस्लामाबादमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून 13,000 हून अधिक जवान तैनात केले आहेत.

यापुर्वी मे महिन्यात इम्रान यांनी आझादी मार्च काढण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, इस्लामाबादेत या मार्चला हिंसक वळण लागले होते. इम्रान समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती. यावेळी आंदोलकांनी रेल्वे स्टेशन पेटवून दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com