Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबान आणि अफगाणी सैन्यातील लढाईत भरडली जातेय सामान्य जनता- UN रिपोर्ट

अफगानिस्तानमधून (Afghanistan) अमेरिकन (America) सैन्य (यूएस आर्मी) परतल्यानंतर अफगाणिस्तानामध्ये अराजकता माजायला सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमन्तक

अफगानिस्तानमधून (Afghanistan) अमेरिकन (America) सैन्य (यूएस आर्मी) परतल्यानंतर अफगाणिस्तानामध्ये अराजकता माजायला सुरुवात झाली आहे. तालिबान (Taliban) आणि अफगाणी सैन्य यांच्यात काबूलवर (Kabul) कब्जा करण्यासाठी युध्द सुरु झाले आहे. मात्र त्याचा परिणाम अफगाणी जनतेवर होऊ लागला आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टनुसार, अफगाणी सैन्य आणि तालिबान यांच्यात सुरु झालेल्या युध्दामध्ये हजारो सामान्य नागरिक यामध्ये भरडले जात आहेत. मे आणि जूनमध्ये यात सर्वाधिक वाढ झाली आहे. दरम्यान या काळात 2400 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 2009 नंतर दोन महिन्यातील सर्वात मोठा आकडा आहे.

यूएन असिस्टेन्स मिशन टू अफगनिस्तान (युनमा) च्या अहवालात म्हटले आहे की, या वर्षी जानेवारी ते जून दरम्यान जवळपास 5183 सामान्य नागरिक भरडले गेले आहेत. ज्यामध्ये 1659 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 47 टक्क्यांची वाढ झाली आहे. अफगाण सैन्य आणि तालिबानमध्ये सुरु असलेल्या युध्दामध्ये सामान्य नागरिकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. यासंबंधी यूएनएमए ने चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी अमेरिका आणि तालिबान यांच्यात अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी शांती समझोता झाला होता. या शांती कराराच्या अंतर्गतच 2021 पर्यंत अमेरिका आपेल सैन्या वापस घेणार होता. मात्र अमेरिकेत सत्ताबदल झाल्यानंतर जो बायडन यांची सत्ता आल्यानंतर यामध्ये मोठे बदल करण्यात आले होते. त्यानंतर नव्या बदलानुसार अमेरिकी सैन्य आणि नाटो सैन्य अफगाणिस्तानमधून सैन्य माघारीपर्यंतचा कालावधी सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आला होता. अमेरिकेकडून सांगण्यात आले होते की, 9/11 च्या आगोदरच आपल्या फौजा वापस घेणार आहेत. या घोषणेनंतर तालिबानने अफगाणिस्तान सैन्य यांच्यात हल्ले प्रतिहल्ले सुरु झाले होते.

अमेरिकेकडून दोन दिवसांपूर्वीच सांगण्यात आले होते की, तालिबान ने अफगानिस्तानमधील पन्नास टक्के भागावर कब्जा केला आहे. दरम्यान तालिबानने मास्कोमध्ये एका प्रेस कॉन्फरंसमध्ये म्हटले होते की, अफगाणिस्तानमधील 80 टक्के भाग आपण ताब्यात घेतला आहे. रविवारपर्यंत तालिबानकडून सांगण्यात आले की, अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांना पायउतार करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: ..होत्याचे नव्हते झाले! किनारे मोकळे, मासेमारी ठप्प, शॅक्समध्ये शुकशुकाट, शेतीचे नुकसान; पावसामुळे गोव्याला मोठा फटका

Panaji Crime: पोलीस स्टेशनसमोरच 2 गटांत राडा! संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी; 3 टॅक्सी, 1 दुचाकी जप्त

Ranji Trophy: गोव्याची फॉलोऑननंतर ‘जिगर’! अभिनव-मंथनची झुंजार भागीदारी; कर्नाटकविरुद्ध लढत अनिर्णित

Montha Cyclone Update: मोंथा वादळाचा 'शालिमार एक्सप्रेस'ला फटका! गोव्यातून सुटली उशिरा; किनारपट्टीजवळील 120 रेल्वेगाड्या रद्द

Roy Naik: 'आपली तयारी, पण पक्षाचा निर्णय अंतिम'! फोंड्यातील पोटनिवडणुकीबद्दल रॉय नाईकांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT