FIA 1383 flags Guinness World Record in New Jersey Dainik Gomantak
ग्लोबल

FIA World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

FIA Guinness World Record 1383 Flag: न्यू जर्सी येथील पार्सिपनी शहरातील व्हेटरन्स मेमोरियल पार्कमध्ये 15 ऑगस्टच्या संध्याकाळी हा कार्यक्रम पार पडला. या रेकॉर्डदरम्यान पोलवर 1383 अमेरिकन राष्ट्रध्वज अशा पद्धतीने लावले होते.

Manish Jadhav

FIA Guinness World Record 1383 Flag: अमेरिकेतील 'फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन' या संस्थेने न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावास आणि 'झोहो कॉर्पोरेशन' यांच्या सहकार्याने 'लार्जेस्ट फ्लॅगपोल नंबर' श्रेणीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. न्यू जर्सी येथील पार्सिपनी शहरातील व्हेटरन्स मेमोरियल पार्कमध्ये 15 ऑगस्टच्या संध्याकाळी हा कार्यक्रम पार पडला. या रेकॉर्डदरम्यान 1383 अमेरिकन राष्ट्रध्वज अशा पद्धतीने लावले, ज्यातून '250' हा भव्य अंक तयार झाला. या संपूर्ण मांडणीच्या चारी बाजूंनी भारताचा तिरंगा लावला.

भारताचा 80वा स्वातंत्र्यदिन आणि अमेरिकेच्या आगामी 250व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त या दोन्ही देशांच्या ऐतिहासिक टप्प्यांचे औचित्य साधून ही रचना करण्यात आली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत परीक्षकांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केल्यानंतर एफआयएच्या पदाधिकाऱ्यांकडे अधिकृत प्रमाणपत्र सुपूर्द केले.

एफआयएचे अध्यक्ष अंकुर वैद्य यांनी या यशाबद्दल बोलताना सांगितले की, हा वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे भारतीय-अमेरिकन समुदायाचे आपल्या संस्कृतीप्रती असलेले प्रेम आणि एकजुटीचे प्रतीक आहे. न्यूयॉर्कमधील भारताचे महावाणिज्य राजदूत बिनय श्रीकांत प्रधान यांनी हा उपक्रम भारत आणि अमेरिका या दोन मोठ्या लोकशाही देशांमधील दृढ मैत्री आणि संबंधांचे अनोखे प्रतीक असल्याचे स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला पार्सिपनीचे महापौर पुलकीत देसाई, न्यू जर्सीचे नायब राज्यपाल डॉ. डेल जी. कॅल्डवेल आणि अमेरिकन काँग्रेसवुमन अनालिलिया मेजिया उपस्थित होते. त्यांनी भारतीय-अमेरिकन समुदायाचे तंत्रज्ञान, सार्वजनिक सेवा आणि स्थानिक व्यापारातील वाढत्या योगदानाचे कौतुक केले. एफआयएचे अध्यक्ष श्रीकांत अक्कपल्ली आणि झोहो कॉर्पोरेशनचे मुख्य प्रवक्ते राजू वेगेस्ना यांनीही या ऐतिहासिक क्षणी व्यासपीठावरुन उपस्थितांना संबोधित केले.

हा रेकॉर्ड करण्यासाठी शेकडो स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. सांस्कृतिक कार्यक्रम आणि या विक्रमी रचनेच्या सार्वजनिक प्रदर्शनाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. 1970 मध्ये स्थापन झालेली एफआयए ही अमेरिकेतील सर्वात मोठी बिगर-नफा संस्था असून ती दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT