America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

America New Visa Restriction Policy Cyber Fraud: सायबर गुन्हेगारी आणि ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांवर लगाम घालण्यासाठी अमेरिकेने अत्यंत कठोर आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
America New Visa Restriction Policy Cyber Fraud
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

America New Visa Restriction Policy Cyber Fraud: सायबर गुन्हेगारी आणि ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांवर लगाम घालण्यासाठी अमेरिकेने अत्यंत कठोर पाऊल उचलले. अमेरिकन नागरिकांना अब्जावधी डॉलर्सचा गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी अमेरिकेने नव्या व्हिसा बंदी धोरणाची अधिकृत घोषणा केली.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या धोरणाची माहिती देताना स्पष्ट केले की, हे पाऊल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सायबर गुन्हेगारी मुळापासून उपटून टाकण्यासाठी दिलेल्या थेट निर्देशांचा एक भाग आहे. या नव्या कडक नियमांनुसार, ऑनलाईन गुंतवणूक घोटाळे, फसवणूक आणि सेक्सटॉर्शनसारख्या गंभीर सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या परदेशी नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा नाकारला जाईल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या व्हिसा बंदीच्या जाळ्यात केवळ आरोपी गुन्हेगारच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश असेल.

America New Visa Restriction Policy Cyber Fraud
America Tariff On India: अमेरिकेचा भारताला मोठा दणका! 'फोर्स्ड लेबर' नियमांचा हवाला देत लावला 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ; ट्रेड डीलची चर्चा सुरु असतानाच झटका

अमेरिकेत 2024 या एकाच वर्षात सायबर फसवणुकीमुळे सामान्य नागरिकांना 12.5 अब्ज डॉलर्सहून अधिकचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यामध्ये सर्वाधिक शिकार ज्येष्ठ नागरिक ठरले असून, त्यांना बनावट ऑनलाईन योजनांद्वारे लुटण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण जागतिक फसवणुकीच्या मागे प्रामुख्याने चिनी गुन्हेगारी टोळ्या कार्यरत असून, त्या लोकांना जाळ्यात ओढून पैसे उकळतात. हे नेटवर्क केवळ अमेरिकन्सना लुटत नसून मनी लाँड्रिंग आणि मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांमध्येही लिप्त आहे. तसेच अमेरिकन मुलांना टार्गेट करणाऱ्या सेक्सटॉर्शन रॅकेटबाबत प्रशासनाने कडक इशारा जारी केला.

America New Visa Restriction Policy Cyber Fraud
America Attack Iran: अमेरिकेचा इराणवर 24 तासांत दुसरा हल्ला; होर्मुझ सामुद्रधुनीजवळील लष्करी ठिकाणं उद्ध्वस्त VIDEO

अमेरिका (America) केवळ व्हिसा नाकारण्यापर्यंत मर्यादित न राहता या गुन्हेगारांवर आर्थिक निर्बंध लादणे, मालमत्ता जप्त करणे, गुन्हेगारी खटले चालवणे आणि प्रत्यार्पण मागणे अशी बहुआयामी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. नुकतेच कंबोडियातील एका मोठ्या ग्रुपशी जोडलेल्या 35 जणांवर आणि संस्थांवर क्रिप्टो घोटाळ्याप्रकरणी कडक निर्बंध लादण्यात आले होते. जगभरात कुठेही बसून अमेरिकन नागरिकांचे शोषण करणाऱ्या कोणाचीही खैर केली जाणार नाही, असा थेट संदेश या धोरणातून देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com