अमेरिकेतील अनेक फेडरल एजन्सीवर सायबर हल्ला झाल्याची बातमी आहे. हॅकर्सने फेडरल एजन्सी हॅक करण्यासाठी फाइल ट्रान्सफर सॉफ्टवेअरमधील 'बग'चा फायदा घेतला. अमेरिकेची सायबर वॉचडॉग एजन्सी सायबर सिक्युरिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सी (CISA) ने हा खुलासा केला आहे.
अमेरिका आणि ब्रिटेनवर झालेल्या या सायबर हल्ल्यामुळे दोन्ही देशांतील अतिमहत्वाच्या माहितीसह सरकारी गुपिते उघड होण्याची शक्यता आहे.
यूएस तसेच यूके आणि इतर अनेक देशांमधील MOVEit सॉफ्टवेअर प्रणाली प्रभावित झाल्या आहेत. खरं तर , MOVEit Transfer च्या डेव्हलपर्सनी गेल्या महिन्यातच सुरक्षा त्रुटी उघड केल्या होत्या. तेव्हापासून हॅकिंगच्या घटना वाढल्या आहेत.
CISA चे कार्यकारी सहाय्यक संचालक एरिक गोल्डस्टीन यांनी एक निवेदन जारी केले की या क्षणी ते हॅकिंगमुळे झालेले नुकसान समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. कंपनीने यूएस फेडरल एजन्सींना झालेल्या नुकसानीचा खुलासा केलेला नाही.
हॅकर्सनी ब्रिटीश एनर्जी कंपनी शेल, जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, जॉन हॉपकिन्स हेल्थ सिस्टम, जॉर्जिया युनिव्हर्सिटी सिस्टमवरही हल्ला केला आहे.
शेल कंपनीच्या प्रवक्त्या अण्णा एर्टा यांनी सांगितले की, MOVEit आमच्या कंपनीचे काही कर्मचारी आणि ग्राहक वापरतात. सायबर हल्ल्याचा शेल कंपनीच्या मुख्य आयटी प्रणालीवर परिणाम झालेला नाही.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या नेटवर्कला या सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. त्याच वेळी, जॉर्जियाच्या विद्यापीठाने सांगितले की ते सध्या सायबर हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करत आहेत.
गेल्या आठवड्यात यूके टेलिकॉम रेग्युलेटर, ब्रिटिश एअरवेज, बीबीसी, ड्रग स्टोअर चेन बूट्सवरही सायबर हल्ला झाला होता.
MOVEit मधील बगमुळे अमेरिका आणि ब्रिटनच्या अनेक सरकारी संस्थावर हल्ले झाले. याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. प्रोग्रेस सॉफ्टवेअरचे शेअर्स गुरुवारी 6.1% घसरले.
MOVEit फाइल ट्रान्सफरसाठी एक लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे, जे संस्थांद्वारे भागीदार किंवा ग्राहकांसह संवेदनशील माहिती शेअर करण्यासाठी वापरले जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.