North Korea Fires Missile: अमेरिका आणि दक्षिण कोरियाला थेट आव्हान! उत्तर कोरियाने डागली दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे

ही दोन्ही क्षेपणास्त्रे कमी अंतरावर हल्ला करण्यास सक्षम आहेत. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या चालीनंतर उत्तर कोरियाने ही चाचणी केली आहे.
North Korea Missile
North Korea MissileDainik GOmantak

North Korea Fires Ballistic Missile Toward East Sea: दक्षिण कोरियाच्या लष्कराने असा दावा केला आहे की उत्तर कोरियाने नुकतेच दोन कमी पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे त्याच्या पूर्व समुद्रकिनारी डागली.

दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने नुकत्याच संपलेल्या लष्करी सरावाच्या निषेधार्थ त्याच्या शस्त्रास्त्र चाचणी क्रियाकलापांना पुन्हा सुरुवात केली असल्याचे मानले जाते.

याआधी मे महिन्यात उत्तर कोरिया आपला पहिला गुप्तचर उपग्रह कक्षेत टाकण्यात अपयशी ठरला होता.

दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने सांगितले की, या क्षेपणास्त्रांचे उत्तर कोरियाच्या राजधानी क्षेत्रातून प्रक्षेपण झाल्याचे आढळून आले. ते म्हणाले की, दक्षिण कोरियाच्या सैन्याने अमेरिकेशी जवळून समन्वय साधून आपली तयारी वाढवली आहे.

अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा युद्धसराव

तत्पूर्वी, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या सैन्याने गुरुवारी कोरियाच्या अत्यंत संरक्षित सीमा भागात दारुगोळ्यासह मोठ्या प्रमाणावर लष्करी सराव केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाने दोन अज्ञात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली.

दरम्यान, उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागल्यानंतर दक्षिण कोरियाचे लष्करही याबाबत सतर्क झाले आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले की, उत्तर कोरियाने त्याच्या पूर्व किनाऱ्यावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले.

North Korea Missile
Australia MP Lidia Thorpe: संसदेत अत्याचाराची बतावणी करणारी कोण आहे महिला खासदार, जाणून घ्या

जपानमध्ये अलर्ट

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनीही उत्तर कोरियाने केलेल्या कथित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणाबाबत त्यांच्या अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत.

जपानी पंतप्रधानांच्या निर्देशाने सुरक्षा अधिकाऱ्यांना विमान, जहाजे आणि इतर सुरक्षा सुनिश्चित करण्यास येत आहे. अधिका-यांनी जास्तीत जास्त माहिती गोळा करून ती जनतेला कळवावी, असे जपानी पंतप्रधानांनी आपल्या सूचनांमध्ये म्हटले आहे.

North Korea Missile
TTP in Pakistan: पाकिस्तानचे तुकडे? बलूचिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्याचा पाकिस्तानी तालिबानचा दावा

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, याआधी गुरुवारी दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या सैन्याने कोरियाच्या अत्यंत संरक्षित सीमा भागात दारुगोळ्यासह मोठ्या प्रमाणावर लष्करी सराव केला होता, त्यानंतर उत्तर कोरियाच्या सैन्याने प्रत्युत्तराची धमकी दिली होती.उत्तर कोरियाने घोषणा केली होती. आता हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com