Sheikh Hasina Dainik Gomantak
ग्लोबल

Sheikh Hasina: वडिलांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांच्याच मुलीला त्याच देशात फाशीची शिक्षा का ठोठावली जातेय? जाणून घ्या तीन कारणं

Sheikh Hasina Death Sentence: बांगलादेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा आणि ऐतिहासिक निर्णय आंतरराष्ट्रीय अपराध न्यायाधिकरणाने दिला.

Manish Jadhav

Sheikh Hasina Death Sentence: बांगलादेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा आणि ऐतिहासिक निर्णय आंतरराष्ट्रीय अपराध न्यायाधिकरणाने दिला. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवता आणि मानवाधिकारांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्यावर गेल्या वर्षी (जुलै 2024) झालेल्या आंदोलनादरम्यान त्यांनी केलेल्या कथित 'मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यां'बद्दल हा खटला सुरु होता. न्यायाधिकरणाने दिलेल्या 453 पानांच्या आणि 6 भागांमध्ये विभागलेल्या या ऐतिहासिक निर्णयानंतर न्यायालयाच्या परिसरात वकिलांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.

शेख मुजिबुर रेहमान यांचा राजकीय वारसा

शेख हसीना या बांगलादेशचे (Bangladesh) संस्थापक आणि 'बंगबंधू' म्हणून ओळखले जाणारे शेख मुजिबुर रेहमान यांच्या कन्या आहेत. शेख मुजिबुर रेहमान यांनी बांगलादेशाला 1971 मध्ये पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखालील आवामी लीग पक्षाने स्वातंत्र्य युद्धात निर्णायक भूमिका घेतली. बांगलादेशच्या निर्मितीचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते.

मात्र, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांतच 1975 मध्ये लष्करी उठावादरम्यान मुजिबुर रेहमान यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर बांगलादेशच्या राजकारणात मोठा अस्थिरतेचा काळ आला. शेख हसीना यांनी वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवत अनेक वर्षे देशाचे पंतप्रधानपद भूषवले, पण आता त्यांच्यावरच 'मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे' आरोप सिद्ध झाल्यामुळे बांगलादेशच्या राजकीय इतिहासातील ही सर्वात मोठी शोकांतिका मानली जात आहे.

फाशीची शिक्षा तीन गंभीर आरोपांसाठी

आंतरराष्ट्रीय अपराध न्यायाधिकरणाने शेख हसीना यांना एकूण तीन गंभीर आरोपांमध्ये दोषी ठरवले. या तिन्ही आरोपांसाठी न्यायालयाने एकच मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्याचा निर्णय घेतला.

शेख हसीना यांच्यावरील तीन मुख्य आरोप आणि शिक्षा

  1. निःशस्त्र आंदोलकांविरुद्ध बळाचा वापर करण्याचे आदेश देणे: आंदोलकांना रोखण्यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टर आणि घातक शस्त्रे वापरण्याचे आदेश शेख हसीना यांनी दिले होते, ज्यामुळे अनेक निष्पाप आंदोलकांचा मृत्यू झाला.

  2. हिंसेसाठी चिथावणी देणे: शेख हसीना यांनी सार्वजनिकरित्या द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणारी चिथावणीखोर विधाने केली.

  3. अत्याचार रोखण्यात अपयश: ढाका आणि आजूबाजूच्या भागांमध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या हत्येसह झालेल्या अत्याचारांना थांबवण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक आणि दंडात्मक पाऊले उचलण्यात त्या अयशस्वी ठरल्या.

न्यायालयाने स्पष्ट केले की, शेख हसीना या सर्वोच्च कमांडर होत्या आणि त्यांच्याकडे गृहमंत्री तसेच पोलीस महानिरीक्षक यांच्यावर नियंत्रण होते. आंदोलकांवरील अत्याचार थांबवणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी होती, परंतु त्या कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरल्या.

इतर आरोपींवरही कारवाई आणि कोर्टाचा निर्णय

आंतरराष्ट्रीय अपराध न्यायाधिकरणाने या प्रकरणात माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत आणखी दोन जणांवर खटला चालवला होता.

  • माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल: न्यायालयाने त्यांना आंदोलकांना उकसवल्याबद्दल दोषी ठरवले.

  • माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल मामून: मामून सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांनी गुन्हा कबूल केला असून ते सरकारी साक्षीदार बनले आहेत.

न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुर्तजा मजूमदार यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्य असलेल्या ट्रिब्यूनलने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. हा निर्णय शेख हसीना यांच्या राजकीय भविष्यावर पूर्णविराम लावणारा ठरला असून, बांगलादेशच्या राजकारणात आता तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

Bicholim Online Fraud: 'इन्व्हेस्टमेंट'च्या नावाखाली फसवणूक! लाखोंचा गंडा घालणाऱ्या संशयिताला मध्यप्रदेशातून अटक; डिचोली पोलिसांची मोठी कारवाई

'माझे घर' योजना अडचणीत, उच्च न्यायालयाची गोवा सरकारला 'नोटीस'; उत्तरासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत मुदत

भारतात क्रिप्टो चलन कोठून आणि कसे खरेदी करावे? संपूर्ण प्रक्रिया, संभाव्य धोके तसेच काय काळजी घ्यावी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT