PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Crisis: कंगालीतही पाकिस्तानचा 'काश्मीरी राग', PM शरीफ यांचं POK बाबत मोठं वक्तव्य

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची वाईट स्थिती जगापासून लपलेली नाही. दैनंदिन वस्तूंसाठी मारामार सुरु आहे. वीज संकटही अधिक गडद होत चालले आहे.

Manish Jadhav

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची वाईट स्थिती जगापासून लपलेली नाही. दैनंदिन वस्तूंसाठी लोकांची मारामार सुरु आहे. वीज संकटही अधिक गडद होत चालले आहे. पेट्रोलचे दर गगनाला भिडत आहेत. दुसरीकडे, महागाईने तर पाकिस्तानींचे कंबरडे मोडले आहे.

कर्जासाठी, IMF पासून जगातील अनेक देशांकडे पाकिस्तान कटोरा घेऊन भीक मागत आहे. आपल्या देशाची दयनीय स्थिती असूनही काश्मीरचे प्रेम पाकिस्तान सोडत नाही. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पीओकेबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले की, आम्ही काश्मिरींना संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार त्यांचा स्वयंनिर्णयाचा अधिकार प्राप्त होईपर्यंत राजनैतिक, राजकीय आणि नैतिक पाठिंबा देत राहीन.'

मुझफ्फराबाद येथे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) च्या विधानसभेच्या विशेष सत्राला संबोधित करताना शरीफ म्हणाले की, 'संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार जम्मू आणि काश्मीर समस्येच्या शांततापूर्ण निराकरणासाठी पाकिस्तानने नेहमीच आग्रह धरला आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'पूर्व तिमोर, दारफूर आणि जगातील इतर प्रदेशांना वांशिक आधारावर स्वातंत्र्य देण्यात आले होते, परंतु जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) आणि पॅलेस्टाईनला हाच आधार लागू करण्यात आलेला नाही.' काश्मिरींना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पाकिस्तान पाळत असलेल्या 'काश्मीर युनिटी डे'च्या निमित्ताने शरीफ बोलत होते.

दुसरीकडे, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर वाद हा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा "महत्वाचा आधारस्तंभ" राहीला आहे.

ते पुढे म्हणाले, "आम्ही काश्मिरी जनतेला बिनशर्त नैतिक, राजनैतिक आणि राजकीय पाठिंबा देत राहू." 'आत्मनिर्णयाच्या अधिकारासाठी' सुरु असलेल्या लढ्याला पाठिंबा व्यक्त केला. इस्लामाबाद, मुझफ्फराबाद, गिलगिट आणि चार प्रांतांच्या राजधानीत एकता मोर्चे काढण्यात आले.

तसेच, गिलगिट बाल्टिस्तानचे लोक अनेक प्रसंगी काश्मीरमध्ये विलीन होण्याची चर्चा करतात. गिलगिट बाल्टिस्तान ते बलुचिस्तानपर्यंतचे लोक पाकिस्तानच्या (Pakistan) राज्यकर्त्यांविरोधात संतप्त आहेत. नुकत्याच झालेल्या विनाशकारी पूरामुळे या प्रांतातील लोकांमध्ये पाकिस्तान सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ronaldo Goa Visit: फुटबॉलप्रेमींचा हार्टब्रेक! अल नासर गोव्यात दाखल; ख्रिस्तियानो रोनाल्डो अनुपस्थित, चाहते नाराज

Narkasur Chor: गोव्यात 'नरकासुरच पळवला'!! भल्या पहाटे दुचाकीवरून नेला चोरून, व्हिडीओ पाहून हसू आवरेना; Watch Video

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

Sancoale Theft: गोव्यात आणखी एक मोठी चोरी, सांकवाळ येथे फ्लॅट फोडला; 8.5 लाखांचे दागिने, महागडी घडयाळे लंपास

SCROLL FOR NEXT