Pakistan Economic Crisis: तोंड बोलतं अन्...! पाक PM च्या वक्तव्यानंतर पाकिस्तानी रुपयात मोठी घसरण

Pakistan: भारताचा शेजारी देश पाकिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan PM Shehbaz SharifDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Economic Crisis: भारताचा शेजारी देश पाकिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पाकिस्तान महागाई आणि उपासमारीने त्रस्त आहे. येथील दैनंदिन वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानातील सर्वसामान्य जनता महागाईने हैराण झाली आहे.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलसाठीही पाकिस्तानी जनतेला मोठी रक्कम मोजावी लागत आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला 2019 मध्ये IMF कडून $6 बिलियनची आर्थिक मदत मिळाली. यानंतरही आयएमएफने गेल्या वर्षी पाकिस्तानला आणखी एक अब्ज डॉलर्सची मदत दिली.

Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan Economic Crisis: जिन्नांच्या पाकिस्तानला IMF कडून 'जोर का झटका', देश उध्वस्त होण्याच्या मार्गावर...

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी शुक्रवारी सांगितले की, 'आम्ही IMF शिष्टमंडळाशी बोललो आहोत. आमचे अर्थमंत्री आणि त्यांच्या टीमसाठी ही कठीण वेळ आहे.' त्यांचे हे वक्तव्य आल्यानंतर काही तासांतच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची मोठी घसरण पाहायला मिळाली.

दुसरीकडे, गेल्या आठवड्यातही पाकिस्तानी रुपया कमकुवत झाला होता. पाकिस्तानची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी उघडपणे मान्य केले. ते म्हणाले की, 'आपल्याकडे संसाधनांची कमतरता आहे. देश आर्थिक संकटाचा सामना करत आहे.'

Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानात महागाईने मोडला 48 वर्षांचा रेकॉर्ड

चीनकडून कर्ज मिळाले, पण व्याजदर खूप जास्त आहेत

चीनकडे कर्ज मागण्याचे धाडस पाकिस्तान करु इच्छित नाही, कारण चीनच्या कर्जावरील व्याजदर जास्त आहे. पाकिस्तानला सर्वाधिक कर्ज देणारा देशही चीनचं आहे. पाकिस्तानवर चीनचे एकूण 30 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. हे देशाच्या एकूण कर्जाच्या 30 टक्के आहे.

परंतु आता चीनचे व्याजदर आणि आयएमएफच्या मागण्यांमध्ये पाकिस्तान अडकला आहे. गेल्या महिन्यात, पाकिस्तानला यूएईकडून तीन अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत मिळाली. सौदी अरेबियाने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे. ही रक्कम एका महिन्याची तेल आयात भागवण्यासाठीही पुरेशी नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com