Elon Musk Dainik Gomantak
ग्लोबल

अबब! Elon Musk च्या चाहत्यांनी उभारला 30 फूट लांब ॲल्युमिनीअमचा पुतळा, वाचा कारण एका क्लिकवर

Elon Musk's Fans Build Statue: एलॉन मस्क यांच्या चाहत्यांनी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून 30 फूट पुतळा तयार केला आहे.

दैनिक गोमन्तक

ट्विटरचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांच्या चाहत्यांनी त्यांचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याची उंची 5 फूट 9 इंच आहे. तसेच रॉकेटवर बसलेल्या बकरीच्या शरीरावर मस्क यांचा हुबेहुब चेहरा तयार करुन लावण्यात आला आहे. हा पुतळा बनवण्यासाठी 4.8 कोटी रुपये खर्चं आला आहे. या पुतळ्याला या चाहत्यांनी "Elon GOAT Token' असे नाव दिले आहे.

  • मस्क यांचा 30 फूट लांब ॲल्युमिनीअमचा पुतळा

एलन मस्क यांचा हा पुतळा कॅनडामधील ( Canada ) धातू मूर्तिकार केविन आणि मिशेल स्टोन यांनी मस्क यांचा हा ॲल्युमिनीअमचा पुतळा बनवला आहे. हा पुतळा ( EGT ) मस्क यांनी भेट देण्याची त्यांची योजना आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केविन आणि मिशेल स्टोन 26 नोव्हेंबर रोजी हा पुतळा टेस्लाच्या टेक्सास येथील मुख्यालयात नेऊन त्यांना भेट म्हणून देणार आहेत.

  • मस्क यांचा पुतळा बनवण्यामागे कारण कोणते

मूर्तिकार केविन आणि मिशेल स्टोन यांनी सांगितले की, एलन मस्क हे जगातील श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी यशाचे सर्वोच्च शिखर गाठले आहे. त्यामुळे ते GOAT- ग्रेट ऑफ ऑल टाइम आहेत. रॉकेट त्यावर बकरीचं शरीर आणि त्यावर मस्क यांचा चेहरा असं या पुतळ्याचं स्वरूप आहे. यामुळे आम्ही त्यांच्या सन्मानार्थ मस्क यांचा हा ॲल्युमिनीअमचा पुतळा उभारला आहे. मीडिया रिपोर्टनुसार EGT या पुतळ्याचा ट्रेलरवरून अमेरिकेत दौरा करण्यात आला आहे.

  • एलन मस्क नेहमीच चर्चेत असतात

मस्क नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमीच व्हायरल होतात. अलिकडेच मस्क यांनी ट्विटर (Twitter) कंपनी विकत घेतल्यानंतर अनेक मोठ्या निर्णयांमुळे मस्क प्रचंड चर्चेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT