Dainik Gomantak
ग्लोबल

आइन्स्टाइन जगापेक्षा होते 100 वर्ष पुढे

वैज्ञानिकांनी ब्लॅक होलचा (Black hole) अभ्यास करण्यासाठी उच्च-शक्तीच्या एक्स-रे दुर्बिणचा (Telescope) उपयोग केला.

दैनिक गोमन्तक

खगोलशास्त्रज्ञांनी प्रथमच ब्लॅक होलच्या (Black hole) मागे एक प्रकाश आढळला आहे. अशाप्रकारे त्यांनी पहिल्यादाच महान वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन (Scientist Albert Einstein) यांचा 'सिद्धांत' (theory) सिद्ध केला आहे. स्टॅनफोर्ड विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलच्या (Black hole) भोवती प्रकाश (Light) कसा दिसतो यांचे विश्लेषण केले गेले आहे. हे ब्लॅक होल सुमारे 800 करोड प्रकाश वर्ष दूर अंतरावर आहे.

वैज्ञानिकांनी ब्लॅक होलचा (Black hole) अभ्यास करण्यासाठी उच्च-शक्तीच्या एक्स-रे दुर्बिणचा (Telescope) उपयोग केला आणि अशा प्रकारे प्रकाश त्याच्या दुसऱ्या बाजूने निघताना दिसला. अभ्यासादरम्यान, खगोलशास्त्रज्ञ (Astronomer) डॅन विल्किन्स यांनी एक महत्वपूर्ण शोध लावला. त्याला आढळले की जेव्हा त्याने एक्स-रे 'गुंज' पाठविली तेव्हा चमकदार प्रकाश एका मालिकेत दिसल्या. तथापि ब्लॅक होलसारखी (Black hole) हे सामान्य आहे. परंतु सर्वात रोमांचक शोध म्हणजे हा की या वेळी अतिरिक्त प्रकाश दिसून आला. जो छोटा आणि भिन्न रंगाचा होता.

अल्बर्ट आइनस्टाइन आपल्या सिद्धांतात काय म्हटले ?

आइंस्टाईनच्या सिद्धांताने अशी भविष्यवाणी केली होती की, ब्लॅक होलमधून गुरुत्वाकर्षण ओढण्या इतके महान असते की अंतरिक्षमधल्या फेबरिक देखील वाकवू शकतो. यामुळे प्रकाश निर्माण होतो. त्यांच्या सिद्धांताने असा अंदाज वर्तविला आहे की ब्लॅक होलच्या दुसऱ्या बाजूने प्रकाशाच्या लाटा पाहणे शक्य आहे. कारण दुमडलेला भाग आरसा म्हणू काम करेल. तथापि, या आधी मागील 100 वर्षापूर्वी हा सिद्धांत सिद्ध झाला नव्हता. पण या शोधानंतर आइनस्टाइनचा सिद्धांत पूर्णपणे बरोबर होता. हे पुनः एकदा स्पष्ट झाले आहे.

* हा शोध सध्याच्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाला

नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनाचे सह- लेखक रोजर बेलँडफोर्ड म्हणाले की पन्नास वर्षापूर्वी जेव्हा खगोलशास्त्रज्ञांनी चुबकीय क्षेत्र ब्लॅक होलच्या जवळ कसे वागतील याची भविष्यवाणी केली होती. या काळात त्याला माहिती नव्हते की एक दिवस आपल्याकडे अशी तंत्रज्ञान असू शकते, ज्याद्वारे ते शोधले जाऊ शकते. एक दिवस आईन्स्टाईनचा सिद्धांत सिद्ध करण्याची साधने आपल्याकडे असतील या गोष्टीपासून ते वंचित होते. ब्लॅक होलमधून गुरुत्वाकर्षण खेचल्या गेले तर त्याभोवती प्रकाश वाकतो. याद्वारे वैज्ञानिकांना ब्लॅक होलच्या मागील जागेची पहिली झलक मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

SCROLL FOR NEXT