Egypt Road Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Egypt Road Accident: इजिप्तमध्ये भीषण अपघात, 28 जणांचा मृत्यू; 60 हून अधिक जखमी

Egypt: इजिप्तमधील बेहेरा येथे शनिवारी एक भीषण रस्ते अपघात झाला.

Manish Jadhav

Egypt Road Accident Vehicles Collided Each Other in Behera 28 People Died: इजिप्तमधील बेहेरा येथे शनिवारी एक भीषण रस्ते अपघात झाला. रिपोर्टनुसार, बेहेरामध्ये रस्त्यावर एकाच वेळी अनेक वाहनांची धडक झाली.

या अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला, तर 60 हून अधिक जण जखमी झाले. ही घटना बेहेरा प्रांतापासून 132 किलोमीटर दूर घडल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, वाहने एकमेकांवर आदळल्यानंतर एका कारमधून पेट्रोल गळू लागले, त्यानंतर काही वाहनांना आग लागली.

दरम्यान, मृतांमध्ये एका भारतीय पर्यटकाचाही (Tourist) समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. एका सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या दोन बसची ट्रकला धडक बसली. ऐन सोखना रिसॉर्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला.

रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, दोन मलेशियन महिला आणि एका भारतीय पुरुषासह तीन इजिप्शियन लोकांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर काही तासांनी कापड कारखान्याच्या कामगारांना घेऊन जाणारी बस एका कारला धडकली.

स्टेट वृत्तपत्र अहरामने आपल्या वेबसाइटवर सांगितले की, हा जीवघेणा अपघात उत्तर इजिप्तमधील बंदर आणि दामिएटा शहरादरम्यानच्या रस्त्यावर झाला.

या अपघातात (Accident) कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या 22 महिला आणि पुरुषांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

Asia Cup 2025: टी-20 आशिया कपमध्ये भारताच्या नावावर 'महा कीर्तिमान'! 'या' संघाविरुद्ध उभारला धावांचा डोंगर; यंदा कोण मोडणार टीम इंडियाचा रेकॉर्ड?

Goa Waterfall Ban: पावसाळ्यातील अपघातांवर अंकुश! उत्तर गोव्यातील धबधबे अन् नद्यांमध्ये प्रवेशास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SCROLL FOR NEXT