Egyptian Church Dainik Gomantak
ग्लोबल

Egypt Church Fire: इजिप्शियन चर्चला भीषण आग, 41 जणांचा मृत्यू

Egypt Church: इजिप्शियन चर्चला भीषण आग लागल्याने चेंगराचेंगरी झाली.

दैनिक गोमन्तक

Egypt Church Fire: इजिप्शियन चर्चला भीषण आग लागल्याने चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 41 जणांचा मृत्यू झाला आहे. इजिप्तच्या (Egypt) कॉप्टिक चर्चने सांगितले की, 'कैरो येथील चर्चला आग लागल्याने 41 लोक ठार आणि 14 जण जखमी झाले आहेत.' चर्चने आरोग्य अधिकार्‍यांचा हवाला देत सांगितले की, 'इम्बाबा, अबू सेफीन चर्च या दाट लोकवस्तीच्या परिसरात ही आग लागली.'

दरम्यान, आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. प्राथमिक तपासात इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी (Police) वर्तवला आहे. पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे की, 'रविवारी सकाळी प्रार्थना सुरु असताना आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या असून जखमींना रुग्णवाहिकांमधून जवळच्या रुग्णालयात (Hospital) नेण्यात येत आहे.'

दुसरीकडे, राष्ट्रपती कार्यालयाकडून सांगण्यात आले की, 'अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी (Abdel Fattah al-Sisi) यांनी कॉप्टिक ख्रिश्चन पोप तावाड्रोस II (Pope Tawadros II) यांच्याशी फोनवर बोलून शोक व्यक्त केला आहे.' अल-सिसीने फेसबुकवर लिहिले की, "मी या दुःखद अपघाताच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मी सर्व संबंधित राज्य संस्था आणि संस्थांना आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT