Economy crisis in Afghanistan afghan people not able to survive  Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबान राजवटीत अफघाण नागरिक उपाशी, पैशासाठी पोटच्याच मुलींची विक्री!

आधीच करोना व्हायरस महामारी, दुष्काळ आणि एका रात्रीत सरकारचा पाडाव आणि त्यानंतर तालिबानचा अफगाणिस्तानवर ताबा. या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती खूपच बिघडली आहे

दैनिक गोमन्तक

तालिबान (Taliban) राजवटीत आता अफगाणिस्तानची (Afghanistan) परीस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. देशाची आर्थिक आणि सामजिक घडी अधिकच संकटात येताना पाहायला मिळत आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती इतकी बिघडत चालली आहे की आता पालकांना आपली पोटची मुले विकावी लागली आहेत. तालिबानने कब्जा मिळवळ्यानंतर अफगाणिस्तानला मिळणारी विदेशी आर्थिक मदत पूर्णपणे बंद झाली आहे त्यामुळे सद्यस्थिती अधिकच बिघडत चालली आहे. (Economy crisis in Afghanistan afghan people not able to survive)

या साऱ्या बाबत एका वृत्तवाहिनीने दिलेल्या अहवालानुसार अफगाणिस्तान हेरातमधील एका गावात, एका आईने तिच्या नवजात मुलीला 500 डॉलर मध्ये विकले आहे जेणेकरून ती तिच्या इतर मुलांना अन्न देऊ शकेल. ज्या व्यक्तीने त्या चिमुकलीला विकत घेतले त्या व्यक्तीने सांगितले की त्याला मुलीचे संगोपन करायचे आहे जेणेकरून तो त्याच्या मुलाचे लग्न तिच्यासोबत करू शकेल, परंतु त्याच्या खऱ्या हेतूची काहीच खात्री नाही.

या व्यक्तीने या कुटुंबाला आता फक्त 250 डॉलर दिले आहेत जेणेकरून बाळाचे कुटुंब काही महिने खाऊ शकेल आणि ही लहान मुलगी ज्यावेळी चालायला लागेल तो तिला घेऊन जाईल आणि उर्वरित 250 डॉलर्स देईल.या मुलीच्या आईने 'माझी बाकीची मुलं भुकेने त्रस्त आहेत, त्यामुळे मला माझी मुलगी विकावी लागली.'असल्याचे सांगितले आहे.

अफगाणिस्तानच्या जीडीपीपैकी 40 टक्के परदेशी मदतीवर आधारित आहे. या आधीच्या सरकारला पाश्चात्य देशांचा पाठिंबा होता.मात्र तालिबान सत्तेत आल्यापासून अनेक देशांनी अफगाणिस्तानला मदत करण्यास नकार दिला आहे.

आधीच करोना व्हायरस महामारी, दुष्काळ आणि एका रात्रीत सरकारचा पाडाव आणि त्यानंतर तालिबानचा अफगाणिस्तानवर ताबा. या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती खूपच बिघडली आहे. त्यामुळेच आता देश आर्थिक मंदीकडे वाटचाल करत आहे. देशातील चलनाची किंमत घसरत असून खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडत आहेत. दुसरीकडे परदेशी निधीही येणे बंद झाले आहे. कामगारांना पगाराशिवाय काम करण्यास भाग पाडले जाते, व्यवसाय बंद झाले आहेत आणि कुटुंबांना जगण्यासाठी त्यांच्या मुलांसह मौल्यवान वस्तू विकावी लागतात हे दुर्दैव असल्याचं बोललं जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT