11 killed in Islamic State Attack Baghdad in Iraq
11 killed in Islamic State Attack Baghdad in IraqDainik Gomantak

इराक मध्ये इस्लामिक स्टेटचा हल्ला, 11 निष्पापांचा बळी

2017 मध्ये इराकचा पराभव झाल्यानंतर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे . मात्र अतिरेकी ते स्लीपर सेलद्वारे बहुतेक भागात सक्रियच आहेत .
Published on

इस्लामिक स्टेटच्या (Islamic State) एका अतिरेकी गटाने मंगळवारी बगदादच्या (Baghdad) ईशान्येकडील एका गावात हल्ला केला आहे ,या हल्ल्यात 11 नागरिक ठार झाले आहेत तर 6 जण जखमी झाले आहेत (Iraq Attack) .स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिया मुस्लिमांच्या गावावर हा हल्ला झाला आहे. गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, दहशतवाद्यांनी आधी दोन गावकऱ्यांचे अपहरण केले आणि त्यांनी मागितलेली खंडणी न दिल्याने गावावर हल्ला केला आहे. (11 killed in Islamic State Attack Baghdad in Iraq)

या हल्ल्यात मशीनगनचा वापर करण्यात आला आहे . 2017 मध्ये इराकचा (Iraq) पराभव झाल्यानंतर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे . मात्र अतिरेकी ते स्लीपर सेलद्वारे बहुतेक भागात सक्रियच आहेत . याआधी जुलैमध्येदेखील झालेल्या एका स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला होता आणि तितकेच लोक जखमी देखील झाले होते.

11 killed in Islamic State Attack Baghdad in Iraq
सुदानमध्ये लष्करी बंडानंतर गोळीबारात सात ठार, तर 140 जखमी

उल्लेखनीय आहे की, अलीकडेच इराकने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या सर्वोच्च नेत्याला आणि अल-कायदाच्या सीमेपलीकडील कारवायातील अनेकांना बराच काळ ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमी यांनी ट्विट करून अटक केलेल्या व्यक्तीचे नाव सामी जसिम असल्याचे सांगितले आहे . या दहशतवाद्याने अबू बकर अल बगदादीसोबत देखील काम केले आहे.

मध्यपूर्वेत वसलेल्या इराकला बऱ्याच काळापासून हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. इथल्या लोकांना कधी युद्ध, कधी दहशतवादी हल्ले, तर कधी इस्लामिक स्टेटच्या लढवय्यांच्या दहशतीला सामोरे लागत आहे. इराकमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे आतापर्यंत मोठ्या संख्येने लोकांना जीव गमवावा लागला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com