Dubai Havoc Flood Dainik Gomantak
ग्लोबल

Dubai Havoc Flood: चोवीस तासांत 83,37,04,00,000 रुपयांचे नुकसान; मुसळधार पावसाने दुबईत ‘हाहाकार’

Dubai Flood: वादळ आणि मुसळधार पावसामुळे UAE मधील परिस्थिती बिकट झाली आहे. अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे.

Manish Jadhav

Dubai Flood: वादळ आणि मुसळधार पावसामुळे UAE मधील परिस्थिती बिकट झाली आहे. अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. UAE मधील वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. अनेक हवाई उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमानतळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची परिस्थिती आहे. दुबईमध्ये पाणी साचल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. 45 हून अधिक उड्डाणे प्रभावित झाली आहेत.

एका अंदाजानुसार, गेल्या 75 वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस आहे. देशाच्या हवामान संस्थेने या पावसाला 'ऐतिहासिक हवामान घटना' म्हटले आहे. दरम्यान, दुबईतील पुरामुळे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. विनाशकारी पावसाने काहीही सोडले नाही. मुसळधार पावसामुळे शहरातील विमानतळ, रस्ते, घरे, व्यापारी संस्था पाण्यात बुडाल्या. येत्या काही आठवड्यांत परिस्थिती सुधारेल असा विश्वास आहे. संपूर्ण वर्षभराचा पाऊस एकाच दिवशी पडल्याने दुबईची परिस्थिती बिकट झाली आहे. सतत साफसफाई केल्यानंतर त्याचा परिणाम येत्या काही दिवसांत दिसून येईल. 100 तासांच्या व्यत्ययानंतर लोकांना त्यांचे काम पुन्हा सुरु करायचे आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साफसफाईसाठी अंदाजे एक अब्ज डॉलर्स खर्च येऊ शकतो. UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन नाहयान यांनी अधिकाऱ्यांना नुकसानीचे त्वरीत मूल्यांकन करण्याचे आदेश दिले आहेत. लोकांच्या गाड्या, घरे आणि व्यावसायिक संस्थानांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाला युद्धपातळीवर काम करावे लागणार आहे. त्याचबरोबर भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

शाळा बंद, कर्मचारी घरुन काम करतात

यापूर्वीही अशा आपत्तींमुळे अनेक देशांमध्ये अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. वास्तविक नुकसान मूल्यांकनाद्वारे निश्चित केले जाईल, परंतु पुरामुळे कमी नुकसान झाले आहे हे अजिबात खरे नाही. विध्वंस अंदाजापेक्षा खूप जास्त असू शकतो. साफसफाईसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च होऊ शकतात. नुकसान $4.2 दशलक्ष पेक्षा जास्त असू शकते. सध्या परिस्थिती सुधारेपर्यंत कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगण्यात आले आहे. शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले

दुबईसह देशाच्या इतर भागांमध्ये मुसळधार पावसानंतर अनेक महामार्ग आणि हमरस्ते पाण्याने भरले आहेत. घरांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे लोकांना घरातच राहावे लागले आहे. मात्र या पावसात फारशी जीवित वा वित्तहानी झालेली नाही.

दुबईला जाणारी विमानसेवाही विस्कळीत झाली

जागतिक विमान कंपन्यांना जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या 'दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' च्या टर्मिनल 1 वरुन उड्डाणे चालवण्याची परवानगी मिळाली आहे. ट्विट करुन सांगण्यात आले की, फ्लाइट्सला सतत विलंब आणि व्यत्यय येत आहे, म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुमच्याकडे निश्चित बुकिंग असेल तरच टर्मिनल 1 वर या. एक दिवस आधी, अनेक भारतीय विमान कंपन्यांनी 18 एप्रिलपर्यंत त्यांची विमानसेवा रद्द केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT