Russia Ukraine War Dainik GOmantak.
ग्लोबल

Drone Attcak On Russia : युक्रेनचे रशियाला प्रत्युत्तर; मॉस्कोवर ड्रोन हल्ला

ड्रोनने मॉस्कोमधील अनेक इमारतींना किरकोळ नुकसान केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Drone Attcak On Russia

रशियाची राजधानी मॉस्कोवर ड्रोन हल्ला झाला असून, मॉस्कोच्या महापौरांनी सांगितले की, ड्रोनने मॉस्कोमधील अनेक इमारतींना किरकोळ नुकसान केले आहे. या दरम्यान कोणीलाही दुखापत झालेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी एका निवेदनात सांगितले की, "शहरातील सर्व आपत्कालीन सेवा घटनास्थळी उपलब्ध आहेत."

ड्रोन हल्ल्यानंतर नुकसान झालेल्या इमारतींमधून काही रहिवाशांना बाहेर काढण्यात येत असल्याचं रशियाच्या महापौरांनी म्हटलं आहे. त्याच वेळी, मॉस्को प्रदेशाचे गव्हर्नर आंद्रेई व्होरोब्योव्ह यांनी सांगितले की मॉस्कोवर हल्ल्याच्या तयारीत असलेले अनेक ड्रोन खाली पाडण्यात आले आहेत.  हे ड्रोन हल्ले कोणी हे अद्याप स्पष्ट झाले नाही.गेल्या 24 तासांत कीव्हवर तीन ड्रोन हल्ले झाले आहेत. यामध्ये एक जण ठार आणि तीन जखमी झाल्यानंतर मॉस्कोवरही ड्रोन हल्ला झाला.

कीव्हचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी म्हटले आहे की, रशियाने केलेल्या तीन ड्रोन हल्ल्यातल किमान एकाचा मृत्यू झाला आहे. एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि इतर दोघे जखमी झाले होते. ते पुढे म्हणाले की 27 वर्षीय महिलेला किरकोळ दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT