Arshad Nadeem Dainik Gomantak
ग्लोबल

Paris Olympics 2024, Arshad Nadeem: अर्शद नदीमवर चीटिंगचा आरोप? डोपिंग टेस्ट करण्याची जोर धरु लागली मागणी!

Manish Jadhav

पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या फायनलमध्ये खळबळ उडवून दिली. गुरुवार 8 ऑगस्टच्या रात्री त्याने असे काही केले ज्याचा कोणी विचारही केला नसेल. पॅरिसमध्ये झालेल्या भालाफेकच्या थरारक फायनलमध्ये त्याने 92.97 मीटर थ्रो करुन खळबळ उडवून दिली. या थ्रोसह अर्शदने नवा ऑलिम्पिक विक्रम केला. दुसरीकडे, भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा 89.45 मीटर थ्रो करुनही सुवर्णपदक जिंकू शकला नाही आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान आता अर्शद नदीमवर चीटिंगचा आरोप होत आहे. त्याने सुवर्णपदक जिंकल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. त्याची डोप टेस्ट करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

अर्शदवर डोपिंगचे आरोप

नीरज चोप्राचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी अर्शद नदीमने पॅरिसमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. भालाफेकीच्या फायनलमध्ये त्याने 6 वेळा भाला फेकण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याचा पहिला थ्रो फाऊल झाला, तर दुसऱ्या थ्रोने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

अर्शदने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर थ्रो करत 16 वर्षांपूर्वीचा ऑलिम्पिक विक्रम मोडला. यापूर्वी, 2008 मध्ये नॉर्वेच्या अँड्रियास थॉर्किलडसेनने 90.57 मीटरचा थ्रो केला होता. यानंतर त्याने 4 वेळा प्रयत्न केला, ज्यामध्ये पुन्हा एकदा त्याने 92 मीटर पार केले. त्याची कामगिरी आश्चर्यचकीत करायला लावणारी आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनी त्याच्यावर फायनलमध्ये ड्रग्ज घेतल्याचा आरोप करत डोप टेस्टची मागणी केली आहे. काहींनी तो या टेस्टमध्ये फेल झाल्याचा दावाही केला आहे, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार 5 पाकिस्तानी आधीच फेल झाले आहेत.

अर्शद नदीमने अनेक विक्रम मोडले

अर्शदने केवळ ऑलिम्पिक विक्रमच मोडला नाही तर आशियाई विक्रमही ध्वस्त केला. त्याच्या आधी केवळ तैवानच्या चाओ सुना चेंगने 91.36 मीटर थ्रो केला होता. 31 वर्षांनंतर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने अशाप्रकारचा विक्रम आपल्या नावावर केला. एवढेच नाही तर वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पाकिस्तानचा पहिला खेळाडू ठरला. पाकिस्तानने आतापर्यंत केवळ 3 वैयक्तिक पदके जिंकली आहेत. गेल्या 32 वर्षांपासून सुरु असलेली ऑलिम्पिक पदकाची पाकिस्तानची प्रतीक्षाही अर्शदने संपवली. यापूर्वी, 1992 च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानने हॉकीमध्ये कांस्यपदक जिंकले होते. अर्शद नदीमने आपल्या अप्रतिम कामगिरीने हे विशेष यश संपादन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT