Donkey  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: गाढवांच्या भरोसे पाकिस्तानची अर्थव्यवस्था! वर्षभरात एवढ्या प्रमाणात वाढली संख्या; शाहबाज सरकार...

Donkey Population In Pakistan: पाकिस्तान सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानमध्ये व्यवसाय ठप्प झाले आहेत.

Manish Jadhav

Donkey Population In Pakistan: पाकिस्तान सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानमध्ये व्यवसाय ठप्प झाले आहेत. कर्ज द्यायलाही कोणी तयार नाही. जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.

दरम्यान, पाकिस्तानसाठी एक आनंदाची बातमी आहे की, त्यांच्या देशात गाढवांची संख्या वाढली आहे. आम्ही असे म्हणत आहोत, कारण पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत गाढवांचा मोठा वाटा आहे.

पाकिस्तानातून (Pakistan) चीनमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. पीईएस 2022-23 च्या सर्वेक्षणात गाढवांच्या संख्येत 1 लाखांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पाकिस्तानात गाढवांची संख्या 57 लाखांवरुन 58 लाखांवर पोहोचली आहे.

पाकिस्तानात गाढवांची संख्या एवढ्या प्रमाणात वाढली आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान आर्थिक सर्वेक्षण 2022-23 मधून असे समजले आहे की, पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून गाढवांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

2019-20 मध्ये पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या 55 लाख होती, जी पुढच्या वर्षी म्हणजे 2020-21 मध्ये 56 लाखांपर्यंत वाढली आहे. पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेत या गाढवांचाही महत्त्वाचा वाटा आहे, कारण पाकिस्तान या गाढवांची चीनला (China) निर्यात करतो.

कोणत्या देशात सर्वाधिक गाढवे आहेत?

विशेष म्हणजे, गाढवांच्या संख्येच्या बाबतीत पाकिस्तान जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्या देशांमध्ये गाढवांची संख्या 50 लाखांपेक्षा जास्त आहे, त्या देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश होतो. पाकिस्तान चीनला गाढवांची निर्यात करुन लाखो डॉलर कमावण्याचा विचार करत असल्याच्या बातम्याही पाकिस्तानी माध्यमांमध्ये येत आहेत. तसेच, गाढवांच्या संख्येच्या बाबतीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे, कारण तो गाढवांचीही मोठ्या प्रमाणात आयात करतो.

चीनमध्ये गाढवांना का मारले जाते?

जिलेटिनवर आधारित चिनी औषधे बनवण्यासाठी चीनमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने गाढवांना मारले जाते. गाढवापासून मिळणारे जिलेटिन औषध तयार करण्यासाठी वापरले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT